India Pakistan U19 match Dubai stadium : क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये टक्कर होणार आहे. दुबईतील मैदानावर आज दोन्ही संघामध्ये टक्कर होणार आहे. सकाळी दहा वाजता नाणेफेक होणार आहे. तर साडेदहा वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. आजच्या सामन्यातही वैभव सुर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. (India vs Pakistan U19 Asia Cup Match Today:)
आज होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असतील. वैभव सूर्यवंशी सध्या भन्नाट फॉर्मात आहे. वैभवने संयुक्त अरब अमिराती (यूएई) विरुद्ध ९५ चेंडूत १४ षटकार आणि ९ चौकारांसह १७१ धावांचा पाऊस पाडला होता. वैभवच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला. यूएईविरुद्ध फक्त ४ धावा काढणारा कर्णधार आयुष म्हात्रे देखील दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्हीवर पाहाता येईल. हा सामना सोनीलिव्ह अॅप आणि त्यांच्या वेबसाइटवर देखील प्रक्षेपित होईल.
एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली. दोन्ही संघांनी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवलाय. भारताने पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा २३४ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४३३ धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये वैभवने १७१ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल यूएईने ७ बाद १९९ धावाच केल्या.
दुसरीकडे पाकिस्तानने पहिल्या सामन्यातही शानदार विजय मिळवला. त्यांनी मलेशियाविरुद्ध पाकिस्तानने ५० षटकांत ३ बाद ३४५ धावा केल्या. सलामीवीर समीर मिन्हासने नाबाद १७७ आणि अहमद हुसेनने १३४ धावांची शानदार शतकी खेळी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी मलेशियाला फक्त ४८ धावांत गुंडाळले. पाकिस्तानने हा सामना २९७ धावांनी जिंकला होता.
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), युवराज गोहिल, कनिष्क चौहान, दीपेश पटेल, दीपेश पटेल, दीपेश पटेल. पटेल, किशनकुमार सिंग, उद्धव मोहन आणि आरोन जॉर्ज.
पाकिस्तान संघ:
साद बेग (कर्णधार), अब्दुल सुभान, अहमद हुसैन, अली रझा, फहम-उल-हक, फरहान युसूफ, हारून अर्शद, मोहम्मद अहमद, मोहम्मद हुजैफा, मोहम्मद रियाजुल्ला, नावेद अहमद खान, शाहजैब खान, तय्यब आरिफ, उमर झैब आणि उस्मान खान.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.