travis head twitter
क्रीडा

AUS vs SCO: 6,6,6,6,6...हेडचा स्कॉटलंडला दणका! मोडून काढला सर्वात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड

Ankush Dhavre

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या स्कॉटलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने तुफान फटकेबाजी करत शानदार विजय मिळवला आहे. १५५ धावांचा पाठलाग करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने हा सामना ९.४ षटकात जिंकला. यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघातील विश्वासू फलंदाज पुन्हा एकदा चमकला आहे. ट्रेविस हेडने ३२० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला आहे.

ट्रेविस हेडने स्कॉटलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने धावांचा पाठलाग करताना २५ चेंडूंचा सामना करत ३२० च्या स्ट्राईक रेटने ८० धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने १२ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार खेचले.

या मोठ्या रेकॉर्डची झाली नोंद

ट्रेविस हेड आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याच्याकडून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. त्याने पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला. त्याने पावरप्लेमध्ये २२ चेंडूंचा सामना करत ७३ धावांची खेळी केली. या खेळीसह तो पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी कुठल्याच फलंदाजाला पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना ७० धावांचा आकडा ओलांडता आला नव्हता. मात्र हेड ७३ धावा करत पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड पॉल स्टर्लिंगच्या नावावर होता. त्याने २०२० मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात २५ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची खेळी केली होती.

ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे या रेकॉर्डची नोंद

यासह ऑस्ट्रेलियाच्या नावेही एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. स्कॉटलंडविरुद्ध झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने धावांचा पाऊस पाडत पावरप्लेच्या षटकात १ गडी बाद ११३ धावा केल्या. यापूर्वी हा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेने २०२३ मध्ये वेस्टइंडीजविरद्ध झालेल्या सामन्यात पावरप्लेमध्ये खेळताना १०२ धावा केल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT