ipl 1000th match
ipl 1000th match 
क्रीडा | IPL

IPL 1000th Match: IPL स्पर्धेत आज घडणार इतिहास! पाहा पहिल्या, १०० व्या अन् ५०० व्या सामन्याचा इतिहास

Ankush Dhavre

Indian Premier League: इंडीयन प्रीमियर लीग स्पर्धेत अनेकांचं स्वप्नं सत्यात उतरलं. तर काहींच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागला. आज वानखेडेच्या मैदानावर आयपीएल स्पर्धेत मोठा इतिहास रचला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार सामना हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील १००० वा सामना असणार आहे.

या सामन्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या पहिल्या, १०० व्या आणि ५०० व्या सामन्याचा इतिहास.

आयपीएल स्पर्धेतील १००० वा सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र पहिला, १०० वा आणि ५०० वा सामना कोणत्या संघांमध्ये रंगला होता? काय घडलं होतं या सामन्यांमध्ये? जाणून घ्या. (1000th Match Of IPL)

आयपीएलचा पहिला सामना..

आयपीएल स्पर्धेमुळे क्रिकेटमध्ये क्रांती घडायला सुरुवात झाली. कारण या स्पर्धेतून अनेक युवा खेळाडूंना जगभरातील दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली होती. स्पर्धेतील पहिलाच सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रंगला होता.

तारीख होती, १८ एप्रिल २००८. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्युलमने १० चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने अवघ्या ७३ चेंडूंमध्ये १५८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २२२ धावा केल्या होत्या.

तर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा डाव ८२ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने १४० धावांनी विजय मिळवला होता. (Latest sports updates)

आयपीएल स्पर्धेतील १०० वा सामना..

आयपीएल स्पर्धेतील १०० वा सामना स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामात पार पडला होता. हा सामना देखील कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. हा ऐतिहासिक सामना दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडला होता. १०० व्या सामन्यात देखील ब्रेंडन मॅक्क्युलम हा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. त्याने ८४ धावांची तुफानी खेळी केली होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाला या डावात २० षटक अखेर ४ गडी बाद १७३ धावा करता आल्या होत्या. या सामन्यात देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.

आयपीएलचा ५०० वा सामना..

आयपीएल स्पर्धेतील ५०० वा सामना ३ मे २०१५ रोजी पार पडला होता. हा सामना मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेविल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने ९१ धावांची तुफानी खेळी केली होती. रहाणेच्या या खेळीच्या जोरावर २० षटक अखेर १८९ धावा केल्या होत्या. १९० धावांचा पाठलाग करताना दिल्लीला अवघ्या १७५ धावा करता आल्या होत्या. या स,सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने १४ धावांनी विजय मिळवला होता.

आज रंगणार १००० वा सामना

आज आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील १००० वा सामना पार पडणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी बीसीसीआयने खास तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामना सुरु होण्याच्या १०-१५ मिनिटांपूर्वी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये 'वंचित'च्या कार्यकर्त्याकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण, व्हिडिओ व्हायरल

IMD Alert: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार, मुंबई-गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Mukta Burve Birthday : 'मुक्ताताई तू माझं आयडॉल आणि इन्स्पिरेशन...'; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने शेअर केली खास पोस्ट

Girish Mahajan: उन्मेष पाटील काहीही बरळतात, गिरीश महाजनांनी आराेप फेटाळले

Farmer Rasta Roko : भर उन्हात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

SCROLL FOR NEXT