Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये शुक्रवारी लखनऊ सुपर जयन्टसनेया हंगामातील सर्वात मोठी धावसंख्या आणि IPL इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. लखनऊ सुपर जायंट्सने मोहालीमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध 257 धावा ठोकल्या. याला प्रत्युत्तर देताना पंजाबचा संपूर्ण संघ 201 धावाच करू शकला.
या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडल्याने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. या हंगामात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. परंतु काही खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या शर्यतीत मोठी आघाडी घेतली आहे.
फाफ डु प्लेसिस-विराट कोहली यांच्यात ऑरेंज कॅपसाठी लढत
आयपीएल 2023 मधील आतापर्यंतचे सर्व सामने रोमांचक झाले आहेत. फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांच्या खेळात सातत्य असताना काही खेळाडूंना सुरुवातीचा उत्कृष्ट फॉर्म राखता आला नाही. त्यामुळेच पर्पल आणि ऑरेंज कॅपची शर्यतही अधिकच रंजक होत आहे. आतापर्यंत दोन शतकेही झाली आहेत.
ऑरेंज कॅपबद्दल बोलायचे झाले तर फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांच्यात चुरशीची लढत आहे. विजेतेपद कोणीही जिंकले तरी चालेल, पण खेळाडूंच्या या कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणतीही कमतरता नाही. चाहते प्रत्येक सामन्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. (IPL 2023)
IPL 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे गोलंदाज
फलंदाज सामने धावा संघ
फाफ डु प्लेसिस 8 422 रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर
विराट कोहली 8 333 रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर
ड्वेन कॉनवे 8 322 चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड़ 8 317 चेन्नई सुपर किंग्स
डेविड वॉर्नर 7 306 दिल्ली कॅपिटल्स
IPL 2023 सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज (Latest Sports News)
गोलंदाज सामने विकेट संघ
मोहम्मद सिराज 8 14 रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर
राशिद खान 7 14 गुजरात टाइटन्स
अर्शदीप सिंह 8 14 पंजाब किंग्स
तुषार देशपांडे 8 14 चेन्नई सुपर किंग्स
वरुण चक्रवर्ती 8 13 कोलकाता नाइट रायडर्स
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.