IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा पहिला टप्पा समाप्त झाला असून आता दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू केला गेला आहे.
इम्पॅक्ट प्लेअरने आपल्या संघासाठी चांगलाच इम्पॅक्ट पाडल्याचे दिसून आले आहे. दरम्यान काही खेळाडू असे देखील आहेत ज्यांनी आपल्या इम्पॅक्टने भारतीय संघाचं दार ठोठावलं आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि आयपीएल स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडत असलेल्या मोहम्मद कैफने काही युवा भारतीय खेळाडूंचे कौतुक केले आहे. ७ सामन्यांमध्ये २३३ धावा करणाऱ्या रिंकू सिंग बद्दल बोलताना मोहम्मद कैफने म्हटले की, 'रिंकू सिंग अप्रतिम खेळाडू आहे.
तो देशांर्तगत क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करतोय. कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायजीने देखील त्याला समर्थन केलं आहे. त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. तो आपल्या खेळाचा दर्जा उंचावतोय. अशी आशा करतो की, तो लवकरच भारतीय संघासाठी खेळताना दिसेल.'
तर राजस्थान रॉयल्स संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने देखील या हंगामात जोरदार कामगिरी केली आहे. या युवा फलंदाजाने फलंदाजी करताना दिग्गज गोलंदाजांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबईकर यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळताना ७ सामन्यांमध्ये २२७ धावा केल्या आहेत.
या हंगामात त्याने आपल्या फलंदाजीचा स्तर आणखी उंचावला आहे. तर गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, अनकॅप्ड गोलंदाज तुषार देशपांडेने देखील दबावाच्या स्थितीत चांगली गोलंदाजी केली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना या गोलंदाजाने सुरुवातीच्या षटकांमध्ये आणि शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करून विकेट्स मिळवून दिल्या आहेत. (Latest sports updates)
आयपीएल स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला..
आयपीएल २०२३ स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वालसह आणखी काही खेळाडू आहेत जे जोरदार कामगिरी करताना दिसून येत आहेत. पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्व झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अथर्व तायडेने तुफानी खेळी करत ६६ धावांची खेळी केली. तर मुंबई इंडियन्स संघाकडून तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा सारखे फलंदाज देखील जोरदार कामगिरी करताय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.