Tilak Varma x
Sports

Tilak Varma : मला Retired Out केलं, कारण... मुंबई इंडियन्सच्या 'त्या' निर्णयावर तिलक वर्मानं सोडलं मौन

Tilak Varma MI : लखनऊ विरुद्ध मुंबई या सामन्यामध्ये तिलक वर्माला रिटायर्ड आउट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची सर्वत्र चर्चा झाली होती. यामुळे तिलक रागावला असल्याचेही म्हटले जात होते. या संपूर्ण प्रकरणावर तिलक वर्माने भाष्य केले आहे.

Yash Shirke

Tilak Varma Mumbai Indians : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात तिलक वर्माने उकृष्ट खेळ केला. १७८ च्या स्ट्राईक रेटने खेळताना ३ षटकार आणि ६ चौकार मारत तिलकने मुंबईची धावसंख्या २०० पार नेण्यात मदत केली. त्याने ३३ बॉल्समध्ये ५९ धावांची दमदार खेळी केली. मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंसह चाहत्यांनी त्याच्या या खेळीचे कौतुक केले.

फक्त दिल्लीच नाही, तर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यातदेखील तिलक वर्मा फलंदाजीत चमकला होता. त्याने आरसीबी विरुद्धच्या सामन्यामध्ये सर्वाधिक ५६ धावा केल्या होत्या. तिलक वर्माच्या खेळाचा दर्जा वाढत असल्याचे पाहायला मिळते. पण लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात तिलक वर्माला रिटायर्ड आउट करण्यात आले होते. या निर्णयामुळे तिलक दुखावला असल्याचेही म्हटले जात आहे.

रिटायर्ड आउट केल्याने तिलक वर्माला राग आला होता अशा चर्चा रंगल्या होत्या. अशातच तिलक वर्माने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले. रिटायर्ड आउट प्रकरणावर त्याने मौन सोडले. तिलक वर्मा म्हणाला, 'त्यांंनी (कर्णधार आणि कोच) संघाच्या हिताच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे असा मी विचार करत होतो. तो निर्णय मी सकारात्मक पद्धतीने स्वीकारला. सांघिक खेळात घेतलेले निर्णय तुम्ही कोणत्या उद्देशाने स्वीकारता हे महत्त्वाचे असते.'

'म्हणून मी त्या पद्धतीने विचार करत होतो. मी ज्या क्रमावर फलंदाजी करायला जातो, तेथे मला कंफर्टेबल होऊन खेळायचे आहे. म्हणून मी कोच आणि स्टाफला सांगितले की, तुम्ही मला कुठल्याही क्रमावर फलंदाजी करायला पाठवा. मी कंफर्टेबल आहे आणि मी माझ्याकडून सर्वोत्तम खेळी करण्याचा प्रयत्न करेन', असे वक्तव्य तिलक वर्माने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT