Tilak Varma Saam Tv
Sports

Tilak Varma : इलेक्ट्रिशियन बापाने उधारीवर शिकवले, आज एकटा तिलक अख्ख्या पाकिस्तानवर भारी पडला, वाचा झिरो ते हिरोपर्यंतचा प्रवास

Tilak Varma Success Story: तिलक वर्मा हा काल खऱ्या अर्थाने भारतीय संघासाठी हिरो ठरला. त्याने काल पाकिस्तानकडून विजय अशरक्ष: खेचून आणला आहे. त्याचा भारतीय संघापर्यंतचा प्रवास खूपच अवघड होता.

Siddhi Hande

दुबईच्या मैदानात भारतीय संघाने पाकिस्तानचा केला पराभव

तिलक वर्मा ठरला खरा हिरो

तिलक वर्माचा स्ट्रगल

इलेक्ट्रिशियन वडिलांचा लेक ठरला भारतीय क्रिकेट संघाचा स्टार

दुबईच्या मैदानात हाय व्होल्टेज सामना.. पाकिस्तानकडून १४७ धावांचं आव्हान, भारताची खराब सुरूवात... हुकमी एक्का अभिषेक, कर्णधार सूर्या अन् प्रिन्स गिल अवघ्या २० धावात माघारी परतले. ४ षटकात फलकावर ३ बाद २० धावा लागल्या होत्या. भारत पराभवाच्या संकटात असताना तिलक वर्मा मैदानात आला. पाकिस्तानी गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत भारतावर दबाव वाढला होता. पण या कठीण परिस्थितून तिलक वर्माने विजय खेचून आणला. ६९ धावांची खेळी करत तिलक वर्माने अख्ख्या पाकिस्तानच्या स्वप्नाला सुरूंग लावला अन् भारतात जल्लोष झाला.

विराट कोहलीनंतर पाकिस्तानविरोधात अशी मॅच काढणाऱ्या तिलक वर्माचे भारतात कौतुक होतेय. पण त्याचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास सोपा नाही. इलेक्ट्रिशियन वडिलांनी मेहनतीने तिलक वर्माला शिकवले, क्रिकेटचे धडे घेण्यास प्रोत्साहन दिले. तिलक वर्मा आज कोट्याधीश आहे, महागड्या गाड्यातून फिरतोय.. पण त्याचा प्रवास अतिशय खडतर राहिलाय... पाकिस्तानच्या संघाला पुरून उरणाऱ्या तिलक वर्माचं कौतुक करावं तितके कमीच आहे. पण त्यामागील त्याचा स्ट्रगल विसरता येणार नाही...

वडील इलेक्ट्रिशियन, आर्थिक परिस्थिती बेताची, तिलक वर्माचा प्रवास (Tilak Varma Struggle)

तिलक वर्मा हा मूळचा हैदराबादचा रहिवासी. तिलक वर्मा आज जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. आज त्याची कोट्यवधींची संपत्ती आहे परंतु एकेकाळी त्यानेही खूप संघर्ष केला. त्याचे वडिल नम्बूरी नागराजू इलेक्ट्रिशियन होते. ते वीजेच्या तारा जोडण्याचे काम करायचे. एकेकाळी घराचा खर्च भागवणेदेखील त्यांच्या वडिलांना कठीण जात होते. तिलक वर्मासोबतच इतर मुलांचीही त्यांच्यावर जबाबदारी होती. परंतु अशा परिस्थितीतही तिलक वर्माच्या ट्रेनिंगमध्ये कोणतीही अडचण येऊ दिली नाही. मुलाचे क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बापाने दिवसरात्र मेहनत केली. आपली आयुष्यभराची पुंजी लेकासाठी दिली.

उधारीवर क्रिकेट किट ते भारतीय संघात निवड (Tilak Varma Success Story )

तिलक वर्मा हा उत्तम क्रिकेटर होता. परंतु त्याला मुंबई इंडियन्सने पारखलं आणि आपल्या संघात घेतलं. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी मुंबई इंडियन्सने लक्षात घेतली. २०२२ मध्ये आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये तिलक वर्माला मुंबई इंडियन्सने १ कोटी ७० लाख रुपयांना विकत घेतले होते.एकेकाळी क्रिकेट किट घ्यायलाही पैसे नसणाऱ्या या हैदराबादच्या मुलाने आज आईवडिलांची सर्व स्वप्ने पूर्ण केली आहेत. त्याच्या कामगिरीमुळे भारतीय संघ पुन्हा एकदा चॅम्पियन झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Chapati Tips: चपाती लगेचच कडक होतेय? कणीक मळताना वापरा ही भन्नाट ट्रिक

Gas Cylinder Blast : कारमध्ये गॅस भरताना स्फोट; जामनेरमधील घटना, सुदैवाने जीवितहानी टळली

Maharashtra Live News Update: कल्याण नगर मार्गावरील शहाड पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

टर्न घेतला अन् कार थेट खड्ड्यात कोसळली; पुण्यातील कार अपघातात एकाचा मृत्यू | VIDEO

Dusshera Dress Ideas: दसऱ्याला करा मराठमोळा साज, पैठणी साडीच्या ड्रेसमध्ये तुम्हीच दिसाल खास

SCROLL FOR NEXT