Oman vs UAE Google
Sports

ICC Cricket: पाकिस्तानच्या नकोशा विक्रमाची पुनरावृत्ती, 'या' ६ फलंदाजाला खातेही उघडता आले नाही, कोणत्या संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम?

ICC Cricket World Cup League-2 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग-२ मध्ये गुरुवारी यूएईचा सामना ओमानशी झाला आणि हा सामना संघासाठी दुःस्वप्न ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रिकेटमध्ये डक आऊट सामान्य आहे. अनेकवेळा नशिबाने फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परततात. पण चक्क अर्धा संघ खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला, असे कोणी म्हणेल तेव्हा सगळेच चक्रावून जातील. पाकिस्तान संघाला तीन वेळा या पेचाचा सामना करावा लागला आहे. पण आता यूएई (UAE) संघानेही पाकिस्तानच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग-२ मध्ये गुरुवारी यूएईचा सामना ओमानशी झाला आणि हा सामना संघासाठी दुःस्वप्न ठरला आहे.

ओमान संघाकडून अशी विक्रमी गोलंदाजी झाली की, यूएईचे ६ फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर UAEने ODI क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक डक आऊटच्या विक्रमाची बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर होता पण आता या यादीत UAE संघाचाही समावेश झाला आहे.

पाकिस्तान, यूएई व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचे संघही लाजिरवाण्या विक्रमांच्या यादीत आहेत. एखाद्या संघाचे ६ फलंदाज 0 धावांवर बाद होण्याची ही सहावी वेळ आहे. शकील अहमदने ओमानसाठी विक्रमी गोलंदाजी केली. ओमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये शकीलने ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. ओमानने हा सामना ४ गडी राखून जिंकला.

Written By: Dhanshri Shintre.

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

SCROLL FOR NEXT