आयपीएलमधील रिटेन्शन लिस्ट जाहीर झाल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या लीगची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा शेजारील देश पाकिस्तानचे खेळाडू या लीगमध्ये का सहभागी होत नाहीत? हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते. तर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा एकही क्रिकेटर आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळला होता. पीएसएलमध्ये तो कराची किंग्ज, मुलतान सुलतान्स, क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर संघाकडून खेळला आहे.
शाहिद आफ्रिदी आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सकडून (DC) खेळला. पीएसएलमध्ये तो पेशावर झल्मी, कराची किंग्ज, मुल्ताल सुलतान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स या संघांसाठी खेळला आहे.
2008 मध्ये, शोएब मलिक दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स)कडून (DC) खेळला. पीएसएलमध्ये तो कराची किंग्ज, मुलतान सुलतान आणि पेशावर झल्मी कडून खेळला आहे.
मिसबाह उल हकने 2008 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (RCB) प्रतिनिधित्व केले. पीएसएलमध्ये तो पेशावर झल्मीकडून खेळला होता.
यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीत राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळला होता. पीएसएलमध्ये तो पेशावर झल्मीकडून खेळला होता.
उमर गुल आयपीएल 2008 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळला होता. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुलतान सुलतान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळला आहे.
मोहम्मद हाफीजने आयपीएल 2008 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) प्रतिनिधित्व केले. तो पीएसएलमध्ये लाहोर कलंदर संघाकडून खेळला होता.
त्यांच्याशिवाय अब्दुल रज्जाक, युनूस खान, सलमान बट, मोहम्मद आसिफ आणि शोएब अख्तर हेदेखील आयपीएलमध्ये खेळले आहेत. रज्जाक रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, युनिस राजस्थान रॉयल्स, सलमान कोलकाता नाईट रायडर्स आणि आसिफ दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग आहे.
Written By: Dhanshri Shintre.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.