indian cricket team twitter/bcci
क्रीडा

IND vs AFG, Super 8: ना विराट, ना रोहित.. हा खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतो एक्स फॅक्टर

Ankush Dhavre

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना २२ जून रोजी बारबाडोसच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाला या मैदानावर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. याच मैदानावर खेळताना भारतीय वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे.

कोण असेल एक्स फॅक्टर?

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांचं म्हणणं आहे की, 'जर या मैदानावर फिरकी गोलंदाजांना मदत मिळणार असेल तर भारताचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. तो अशा खेळपट्टीवर संघाला विकेट्स काढून देऊ शकतो. ईएसपीएनक्रीकइन्फोवर बोलताना स्टीफन फ्लेमिंग म्हणाला की, ' तुम्ही खेळण्याच्या पद्धतीवर इतकं अवलंबून राहू शकत नाही की तुम्ही परिस्थितीचा फायदा घेण्याची संधीच गमावून टाकाल. माझं म्हणणं इतकंच आहे जर खेळपट्टीवर चेंडू फिरणार असेल तर कुलदीप यादव घातक ठरू शकतो.'

यासह भारतीय संघाच्या निवडीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ' भारतीय संघाला आधीच कठीण निर्णय घ्यावे लागले आहेत. भारतीय संघाने फायनल डोक्यात ठेवून संघाची निवड केली आहे. इथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. भारतीय संघाने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये दमदार खेळ केला. आता सुपर ८ फेरीत भारतीय संघाचा पहिला सामना अफगाणिस्तानविरूद्ध होणार आहे. त्यानंतर पुढील सामन्यात भारतीय संघ बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करताना दिसून येणार आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT