trent boult twitter
Sports

New Zealand Cricket Team:न्यूझीलंडच्या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडूची निवृत्ती? सामन्यानंतर केली मोठी घोषणा

Trent Boult Retirement: न्यूझीलंड संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजाने मोठी घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या सुमार कामगिरीनंतर संघातील प्रमुख गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने मोठी घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा शेवटचा सामना १७ जून रोजी होणार आहे. हा त्याच्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटचा सामना असणार आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडला अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर करो या मरो सामन्यात न्यूझीलंडला १५० धावांची गरज होती. मात्र या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अपयशी ठरला होता. या गटातून अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिजने सलग ३-३ सामने जिंकले. यासह सुपर ८ चं तिकीट मिळवलं. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यानंतर बोल्टने घोषणा केली होती, की हा त्याचा शेवटचा टी-२० वर्ल्डकप असणार आहे.

काय म्हणाला ट्रेन्ट बोल्ट?

युगांडाविरुद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने सोपा विजय मिळवला. या विजयानंतर बोलताना ट्रेन्ट बोल्ट म्हणाला की, 'माझ्याबद्दल सांगायचं झालं, हा माझा शेवटचा टी-२० वर्ल्डकप असणार आहे.' यावरुन स्पष्ट झालं आहे की, ट्रेन्ट बोल्ट टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटचा सामना १७ जून रोजी पापुआ न्यू गिनीविरुद्ध होणार आहे.

तसेच न्यूझीलंड संघाच्या या हंगामातील सुमार कामगिरीबद्दल बोलताना ट्रेन्ट बोल्ट म्हणाला की, ' आम्हाला खरंच अशी सुरुवात करायची नव्हती. हे पचवणं फार कठीण आहे. आम्ही स्पर्धेत पुढे जाऊ शकलो नाही, यामुळे आम्ही नाराज आहोत. मात्र जेव्हा देशासाठी खेळण्याची संधी मिळते तेव्हा अभिमानाची बाब असते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT