Trent Boult Wicket: ट्रेन्ट बोल्टने तोडलेल्या LED स्टम्पची किंमत ऐकून बसेल धक्का! BCCIचं लाखोंचं नुकसान

Trent Boult Bowled Sunil Narine: या सामन्यात ट्रेन्ट बोल्टने भन्नाट गतीने यॉर्कर चेंडू टाकला आणि सुनील नरेनला क्लिन बोल्ड केलं. दरम्यान त्याने तोडलेल्या स्टम्पची किंमत किती? जाणून घ्या.
KKR vs RR cost of led stumps which trent boult broke against sunil narine amd2000
KKR vs RR cost of led stumps which trent boult broke against sunil narine amd2000twitter

राजस्थान रॉयल्स संघातील वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट हा आपल्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. आयपीएल स्पर्धेतील ३१ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ट्रेन्ट बोल्टने शतकवीर सुनील नरेनचा काटा काढत त्याला माघारी धाडलं. दरम्यान त्याला क्लिनबोल्ड केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, कोलकाता नाईट रायडर्स संघाची फलंदाजी सुरु असताना राजस्थान रॉयल्स संघाकडून ट्रेन्ट बोल्ट गोलंदाजीला आला. या षटकातील तिसराच चेंडू त्याने यॉर्कर टाकला जो सुनील नरेनला कळालाच नाही. हा चेंडू इतका वेगवान होता, की स्टम्पला लागताच स्टम्पचे २ तुकडे झाले.

KKR vs RR cost of led stumps which trent boult broke against sunil narine amd2000
RCB,IPL 2024: RCB ला मोठा धक्का! स्टार खेळाडूची IPL मधून अनिश्चित काळासाठी विश्रांती

तुटलेल्या स्टम्पची किंमत किती?

आयपीएल २०२४ स्पर्धेत हायटेक स्टम्पंचा वापर केला जात आहे. सामन्यात फलंदाज बाद झाला, चौकार मारला, षटकार मारला आणि किंवा नो चेंडू असल्यास या स्टम्पमध्ये लाईट पेटते. क्रिकेटमध्ये दोन्ही बाजूला ३-३ असे ६ स्टम्प लावले जातात. माध्यमातील वृत्तानुसार या एका स्टम्पची किंमत १० लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंना ३०-३० अशा ६० लाखांच्या स्टम्पचा वापर केला जातो. हेच कारण आहे की, सामना जिंकल्यानंतर खेळाडूंना स्टम्प काढण्याची अनुमती दिली जात नाही. ज्यावेळी लाकडी स्टम्प असायचे त्यावेळी सामना जिंकल्यानंतर खेळाडू स्टम्प काढून मैदानाबाहेर घेऊन जायचे.

KKR vs RR cost of led stumps which trent boult broke against sunil narine amd2000
IPL 2024 Points Table: हैदराबादच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! तुमचा आवडता संघ कितव्या स्थानी?

सुनील नरेनचं शतक..

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सुनील नरेनने सर्वाधिक १०९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर कोलकाताने २० षटकअखेर २२३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना जोस बटलरने शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com