IPL 2024 Points Table: हैदराबादच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! तुमचा आवडता संघ कितव्या स्थानी?

Updated IPL 2024 Latest Points Table, Team Rankings: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPL 2024 latest points table standings after RCB vs SRH Match
IPL 2024 latest points table standings after RCB vs SRH Match twitter

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा या हंगामातील सहावा पराभव ठरला आहे. आतापर्यंत ७ सामने खेळलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला केवळ पंजाबविरुद्ध खेळताना विजय मिळवता आला आहे. तर उर्वरित सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाच्या विजयानंतर कशी आहे गुणतालिकेची स्थिती? जाणून घ्या.

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. या संघाने ६ पैकी ५ सामने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. या संघाने ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत करणारा सनरायझर्स हैदराबादचा संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर पाचव्या स्थानी असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने ६ पैकी ३ सामने जिंकले आहेत.

IPL 2024 latest points table standings after RCB vs SRH Match
IPl 2024: हार्दिक पांड्याचं T20WC मध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार? पुढील ८सामन्यात ठरणार भवितव्य

उर्वरित संघांबद्दल बोलायचं झालं तर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ या यादीत सहाव्या स्थानी आहे. या संघाने ६ पैकी ३ सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्जचा संघ या यादीत सातव्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करून मुंबई इंडियन्सकडे गुणतालिकेत वर जाण्याची संधी होती. मात्र या पराभवानंतर मुंबईचा संघ आठव्या स्थानी कायम आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ नवव्या स्थानी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

IPL 2024 latest points table standings after RCB vs SRH Match
Dinesh Karthik Six: दिनेश कार्तिकने खेचला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार! चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर- Video

असे आहेत १० संघ (IPL 2024 Point Table)

१)राजस्थान रॉयल्स - १० गुण

२) कोलकाता नाईट रायडर्स -८ गुण

३) चेन्नई सुपर किंग्ज - ८ गुण

४) सनरायझर्स हैदराबाद - ८ गुण

५) लखनऊ सुपर जायंट्स - ६ गुण

६) गुजरात टायटन्स - ६ गुण

७) पंजाब किंग्ज - ४ गुण

८) मुंबई इंडियन्स - ४ गुण

९) दिल्ली कॅपिटल्स - ४ गुण

१०) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २ गुण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com