indian women's cricket team won asia cup 2022 Saam Tv
Sports

WPL Auction 2023: वुमेन्स आयपीएल ऑक्शनमध्ये 'या' भारतीय खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा;लागू शकते कोटींची बोली

१३ फेब्रुवारी रोजी महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या (Women's premiere league Auction) लिलाव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई, Saam TV News

WPL Auction 2023: मुंबईत १३ फेब्रुवारी रोजी महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या (Women's premiere league Auction) लिलाव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ५ फ्रेंचायझी एकूण ४०९ खेळाडूंवर बोली लावणार आहेत.

प्रत्येक फ्रेंचायझीकडे १२-१२ कोटींचा पर्स असणार आहे. या पर्सचा वापर करून त्यांना कमीत कमी १५ आणि जास्तीत जास्त १८ खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. अशात काही खेळाडू आहेत, जे कोटींची कमाई करू शकतात.

लिलावात या खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली..

हरमनप्रीत कौर :भारतीय संघाची अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. टी -२० क्रिकेटमध्ये ती ३ हजार धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. टी -२० क्रिकेटमध्ये तिची फलंदाजी सरासरी २८.२६ इतकी आहे. त्यामुळे आगामी तिच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.

स्मृती मंधाना : भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. अनेकदा तिने जोरदार कामगिरी करत भारतीय संघाला विजय देखील मिळवून दिला आहे. सध्या तो महिलांच्या टी -२० रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, स्मृती मंधानावर मोठी बोली लागू शकते.

जेमीमा रॉड्रिग्ज : जेमीमा रॉड्रिग्जने २०१८ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत ७५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान तिने ३० च्या सरासरीने १५७५ धावा केल्या आहेत. त्यामुळे १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लिलावात जेमीमा रॉड्रिग्जवर देखील फ्रेंचायझी मोठी बोली लावू शकतात.

दीप्ती शर्मा : भारतीय महिला संघातील अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा सध्या टी -२० गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या तर अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तिची ही जोरदार कामगिरी पाहता, फ्रेंचायझी तिच्यावर पैशे खर्च करताना मागचा पुढचा विचार करणार नाही.

शेफाली वर्मा: मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून ओळखली जाणारी शेफाली ही भारतीय महिला संघातील सर्वात आक्रमक फलंदाज आहे. नुकताच तिने भारतीय १९ वर्षाखालील संघाला टी -२० वर्ल्ड कप जिंकून दिला होता. १९ वर्षीय शेफालीने आतापर्यंत १२३१ धावा केल्या आहेत. त्यामुळे शेफाली वर्मावर देखील कोटींची बोली लागेल यात काहीच शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT