Ind vs Aus:अश्विनने रचला इतिहास!असा कारनामा करणारा ठरला दुसराच गोलंदाज

आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या नागपूर कसोटीत देखील त्याच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे.
Ind vs Aus
Ind vs AusSaam Tv

Ind vs Aus:आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या नागपूर कसोटीत देखील त्याच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे.

त्याने या सामन्यातील दुसऱ्या डावात अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

आर अश्विनने रचला इतिहास..

आर अश्विनने या सामन्यातील पाहिल्या डावात गोलंदाजी करताना १५.५ षटकात ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज बाद केले होते. तर दुसऱ्या डावात तो आणखी आक्रमक गोलंदाजी करताना दिसून आला. ऑस्ट्रेलिया संघाचे जेव्हा ७ फलंदाज माघारी परतले होते.

त्यापैकी ५ फलंदाज हे आर अश्विनने बाद केले होते. या डावात ५ गडी बाद करताच त्याने अनिल कुंबळेंचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

Ind vs Aus
IND vs AUS:या ३ खेळाडूंमुळे भारतीय संघाने मिळवला एकहाती विजय

असा कारनामा करणारा ठरला दुसरा भारतीय गोलंदाज..

आर अश्विनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ३१ वेळेस एकाच डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. या यादीत त्याने दुसरे स्थान मिळवले आहे.

तर या यादीत अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहेत. अनिल कुंबळे यांनी ३५ वेळेस ५ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे.

Ind vs Aus
IND VS AUS 1st Test :तिसऱ्या दिवशीही भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर भारी! पहिल्या डावात घेतली इतक्या धावांची आघाडी

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत केला हा विक्रम.

या कामगिरीसह आर अश्विन बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे हे बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहेत.

अनिल कुंबळे यांनी १११ गडी बाद केले आहेत. तर आर अश्विनने आतापर्यंत एकूण ९६ गडी बाद केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com