Government Job For Mohammad Siraj x
क्रीडा

Mohammad Siraj: भारतीय क्रिकेटर सिराजचं नशीब फळफळलं; राज्य सरकार नोकरीसह देणार भूखंड

Government Job For Mohammad Siraj: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. क्रिकेटपटू मोहम्मद सिराजला भूखंड आणि सरकारी नोकरी देणार असल्याची घोषणा तेलंगणा सरकारने केलीय.

Bharat Jadhav

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केलीय. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद सिराज यांच्या भारतीय क्रिकेटमधील योगदान आणि आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषक जिंकण्यात त्याने केलेल्या योगदानाचं गौरव मुख्यमंत्र्याकडून करण्यात आलं. भारताच्या टी२० विश्वचषक विजयानंतर मोहम्मद सिराज मागील आठवड्यात हैदराबादला परतला. तेथे त्याने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिराजला भूखंड आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केलीय.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सिराजचा सन्मान केला. सिराजच्या असामान्य प्रतिभेची प्रशंसा करत मुख्यमंत्र्यांनी सिरजचं वर्णन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक असल्याचं केलं. “मोहम्मद सिराज यांनी आपल्या देशाला मोठा अभिमान आणि तेलंगणा राज्याला मोठा सन्मान मिळवून दिल्याचं देखील रेवंत रेड्डी म्हणालेत.

तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेल्या सिराजचा आणि रेड्डी यांचा फोटो पोस्ट केलाय. या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अष्टपैली क्रिकेटर मोहम्मद सिराजचं अभिनंदन केलं. सिराजने तेलंगणा राज्याला आणि भारत देशाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी ओळख मिळवून दिल्याने मुख्यमंत्र्यानं त्याचं अभिनंदन केलं. दरम्यान मोहम्मद सिराजची मुख्यमंत्र्यांची भेट घेणं ही एक औपचारिकता होती.

“मुख्यमंत्र्यांनी सिराजच्या टी२० विश्वचषक २०२४ मधील उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. सिराजला भूखंड आणि नोकरी देण्याचे आदेश राज्य सरकारने अधिकाऱ्यांना दिलेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना हैद्राबाद किंवा आसपासच्या भागात योग्य जागा शोधून सरकारी नोकरी देण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आदेश दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT