David Wiese Retirement: दोन देशांकडून क्रिकेट खेळणाऱ्या दिग्गजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

David Wiese News In Marathi: दक्षिण आफ्रिका आणि नामिबियाकडून क्रिकेट खेळणाऱ्या विजेने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.
David Wiese Retirement: दोन देशांकडून क्रिकेट खेळणाऱ्या दिग्गजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
david wiesetwitter
Published On

डेविड विजेने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ३४ व्या सामन्यात इंग्लंड आणि नामिबिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा डेव्हिड विजेच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे. आपल्या शेवटच्या सामन्यात त्याने २७ धावांची खेळी केली आणि गोलंदाजी करताना १ गडी बाद केला.

दोन देशांकडून क्रिकेट खेळणाऱ्या डेव्हिड विजेने अजूनपर्यंत अधिकृतरित्या कुठलीही घोषणा केलेली नाही. मात्र तो ज्या पद्धतीने मैदान सोडून बाहेर गेला, त्यावरुन हेच वाटत होतं की, ही त्याच्या टी-२० कारकिर्दीतील शेवटची खेळी होती. तो ज्यावेळी बाद झाला त्यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी हात मिळवत डेव्हिड विजेला मिठीही मारली.

David Wiese Retirement: दोन देशांकडून क्रिकेट खेळणाऱ्या दिग्गजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
Team India News: टीम इंडियाच्या या ३ खेळाडूंना सुपर ८ मध्ये संधी मिळणं कठीण! संपूर्ण स्पर्धेत बसावं लागेल बाहेर

दोन देशांसाठी खेळला क्रिकेट

डेव्हिड विजे त्या खेळाडूंमधून आहे ज्यांना दोन देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. सध्या तो नामिबियाकडून क्रिकेट खेळतोय. या संघाकडून खेळण्यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिका संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेकडून वनडे आणि टी-२० क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली .

David Wiese Retirement: दोन देशांकडून क्रिकेट खेळणाऱ्या दिग्गजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
England vs Namibia, Super 8: नामिबियाला धूळ चारत इंग्लंडचं दमदार कमबॅक! सुपर ८ मध्ये जाण्यासाठी असं आहे समीकरण

अशी राहिली कारकिर्द

डेव्हिड विजेच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १५ वनडे आणि ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याला २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून त्याला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने ३३० धावा करत गोलंदाजीत १५ गडी बाद केले. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ६२४ धावा करत गोलंदाजीत ५९ गडी बाद केले.

तर नामिबियाकडून खेळताना त्याला ९ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २२८ धावा केल्या. तर गोलंदाजीत ६ गडी बाद केले. यासह वनडे क्रिकेटमध्ये त्याने ५२८ धावा करत ३५ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com