shubman gill  twitter
क्रीडा

Shubman Gill News: टीम मॅनेजमेंटने शुभमन गिलला बाहेर करण्याचा केला होता प्लान; शतक झळकावल्यानंतर मोठा खुलासा

Ankush Dhavre

Shubman Gill News In Marathi:

वायझॅगच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांसमोर ३९९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यातील पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने सर्वाधिक २०९ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात शुभमन गिलने १०४ धावांची खेळी केली.

शुभमन गिलला गेल्या काही सामन्यांमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यापूर्वी तो ११ इनिंगमध्ये तो फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. या ११ इनिंगमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नव्हतं.

मार्च २०२३ मध्ये त्याने कसोटीतील शेवटचं शतक झळकावलं आहे. अहमदाबादच्या मैदानावर त्याने १२८ धावांची खेळी केली होती. सतत संधी मिळूनही चांगली कामगिरी करत नसल्याने टीम मॅनेजमेंट टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता. (Cricket news in marathi)

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, वायझॅग कसोटी सुरु होण्यापू्र्वी टीम मॅनेजमेंटने शुभमन गिलला वॉर्निंग दिली होती. त्याला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, जर तिसऱ्या क्रमांकावर खेळताना तो पुन्हा एकदा प्लॉप ठरला तर त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी जावं लागेल.

तसेच या वृ्त्तात असंही म्हटलं गेलं आहे की, शुभमन गिलला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आपली चूक सुधारण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. असं झालं असतं तर तो आता गुजरात विरुद्ध पंजाबच्या सामन्यात पंजाब संघाचं प्रतिनिधित्व करत असता. हा सामना येत्या ९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

शतक झळकावत टीका करणाऱ्यांना दिलं उत्तर..

शुभमन गिल हैदराबाद कसोटीत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. या सामन्यातील पहिल्या डावात गिलने अवघ्या २३ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. तर वायझॅग कसोटीतील त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र तो ३४ धावांवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ अडचणीत असताना त्याने १०४ धावांची बहुमूल्य खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT