IND vs NED:  Social Media
Sports

IND vs NED: टीम इंडियानं दिलं दिवाळी गिफ्ट; नेदरलँडला पराभूत करत विजयाची घौडदौड कायम

IND vs NED: टीम इंडियाने विश्वचषकातील ४५ वा सामना १६० धावांच्या फरकांनी जिंकला आहे.

Vishal Gangurde

India vs Netherlands Cricket Match:

टीम इंडियाने साखळी फेरीच्या ९ व्या सामन्यात नेदरलँडला पराभूत करत भारतीयांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. टीम इंडियाने विश्वचषकातील ४५ वा सामना १६० धावांच्या फरकांनी जिंकला आहे. या विजयाआधीच टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली आहे. तर दुसरीकडे नेदरलँडला पॅकअॅप करावं लागणार आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाने नेदरलँडला पराभूत विश्वचषकात ९ वा विजय प्राप्त केला आहे. विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सर्वच क्रिकेट संघाना बाद केलं. आज रविवारच्या विजयामुळे टीम इंडियाला गुणतालिकेत १८ गुण मिळाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या शतकाच्या जोरावर ४१० धावा केल्या. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड संघ ४७.५ षटकात 250 धावांवर ढेपाळला.

४११ धावांचा पाठलाग करताना नेदरलँडची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकात नेदरलँडला पहिला झटका दिला. कुलदीप यादवने कोलिनला ३२ धावांवर बाद केलं. तर मॅक्सला रविंद्र जडेजाने बाद केलं.

आजच्या सामन्यात विराट कोहलीनेही गोलंदाजी केली. विराट कोहलीने स्कॉटला बाद केलं. विराटने एकदिवसीय कारकिर्दीत पहिला गडी बाद केला आहे. स्कॉट बाद झाल्यानंतर नेदरलँडच्या फलंदाजांची पडझड कायम राहिली.

टीम इंडियाच्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने आजच्या सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. श्रेयस अय्यरने १२८ धावा केल्या. तर केएल राहुलने १०२ धावा कुटल्या. तर टीम इंडियाच्या तीन फलंदजांनी अर्धशतकीय खेळी खेळली. यामुळे टीम इंडियाने ४१० इतक्या धावसंख्येचा डोंगर उभारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

SCROLL FOR NEXT