Team India Viral Fan Saam tv
Sports

Team India Viral Fan : टीम इंडियाला पाहण्यासाठी भन्नाट कल्पना सुचली कशी? झाडावर बसणाऱ्या कार्यकर्त्याने सर्वच सांगितलं

Team India Viral Fan Awadhesh Shah : विश्वविजेत्या टीम इंडियाला पाहण्यासाठी झाडावर बसणाऱ्या कार्यकर्त्याने सर्वच सांगितलं. भन्नाट कल्पना सुचली कशी, याविषयीही अवधेश भरभरून बोलला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईत विश्वविजेत्या टीम इंडिया संघाची गुरुवारी विजयी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीला हजारो चाहत्यांची गर्दी झाली होती. सकाळपासूनच अनेक तरुण भूक-तहान विसरून विजयी मिरवणूक रॅलीसाठी हजर राहिले होते. तर काही तरुण कॉलेज बंक करुन टीम इंडियाला पाहण्यासाठी पोहोचले होते. प्रचंड गर्दीत ताटकळत उभे राहून टीम इंडियाची झलक पाहत होते. प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती देखील झाली. तरी तरुणाई मागे हटली नाही. या प्रचंड गर्दीत एका चाहत्याने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

टीम इंडियाला पाहण्यासाठी हा कार्यकर्ता थेट झाडावर जाऊन बसला होता. टीम इंडियाला पाहण्यासाठी झाडावर बसणारा कार्यकर्ता माध्यमांसमोर आला आहे. यावेळी या चाहत्याने टीम इंडियाला पाहण्यासाठी भन्नाट कल्पना कशी सुचली, याविषयी सांगितलं.

अवधेश शाह असे या क्रिकेटप्रेमी चाहत्याचं नाव आहे. टीम इंडियाला पाहण्यासाठी झाडावर बसणारा अवधेश शाह हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने झाडावर बसून काढलेला व्हिडिओही व्हायरल होत आहे. झाडावर बसण्याची कल्पना कशी सुचली, याविषयी अवधेश शाहने भरभरून सांगितलं आहे. एका रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अवधेशने सर्व काही सांगितलं आहे.

झाडावर चढण्याची आयडिया कशी सुचली?

भन्नाट कल्पना कशी सुचली, यावर बोलतना अवधेश शाह म्हणाला की, ' विजयी मिरवणूक रॅलीच्या मार्गावर तरुणांची खूप गर्दी उसळली होती. पोलिसही गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तरुणांना धक्का मारत होते. माझ्या पायालाही लागलं होतं. त्यामुळे वाटलं झाडावर चढुयात. झाडावर चढल्यामुळे जवळून पाहायला मिळेल. तसेच फोटो आणि व्हिडिओ काढायला मिळेल, त्यामुळे झाडावर चढलो'.

झाडावर चढला तर भीती वाटली नाही का? यावर अवधेश म्हणाला, 'मी टीम इंडियासाठी इतका त्याग तर करू शकतो. मी क्रिकेटप्रेमी आहे. मी विराट कोहलीचा फॅन आहे. रोहित शर्माचाही सर्वात मोठा चाहता आहे'.

'...अन् मी नशीबवान ठरलो'

'मला वाटलं नव्हतं की, मी एवढा व्हायरल होईल. ही सोशल मीडियाची कमाल आहे. बाजूच्या फांदीवर माझा मित्र होता. पण त्याच्या पेक्षा मीच व्हायरल झालो. आता चांगलं वाटत आहे, असेही त्याने म्हटलं. 'विराटने पाहिल्यानंतर खूप चांगलं वाटलं. लाखो लोकांच्या गर्दीत रविंद्र जडेजा आणि विराट कोहलीने माझ्याकडे बोट दाखवलं. त्यामुळे मी नशीबवान ठरलो आहे. मी सर्वांना खूप जवळून पाहिलं, असेही अवधेशने सांगितलं.

'घरच्यांचा ओरडा खाल्ला'

'झाडावर चढल्याने आई जास्त काही बोलली नाही. मात्र, वडील ओरडले. त्यांच्या शिव्याही खाल्ल्या. व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे मेसेज आले आहेत. फोटो आणि व्हिडिओ मागत आहेत. अनेक जण अभिनंदन करत आहे, असेही त्याने सांगितले.

आता पुढील इच्छा काय, यावर अवधेश म्हणाला की, 'विराट कोहलीला भेटायचं आहे. मी विजय मिरवणूक रॅलीत त्याला फार जवळून पाहिलं. मी त्याला हात मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हात मिळव्यास यश मिळालं नाही. मी त्याला आवजही देत होतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janmashtami 2025 : लाडक्या कान्हाला '५६ भोग' असा नैवेद्यच का अर्पण केला जातो?

Child Birth Rate : लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाचा मोठा निर्णय; मुलाच्या जन्मासाठी मिळणार तब्बल ६ लाख रुपये

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

Chetana Bhat: असं रुप पाहिलं अन् मन गहिरवरुन आलं...

SCROLL FOR NEXT