Team India Celebration: वंदे मातरम सुरु असताना फॅनने हार्दिकच्या हातात फेकला टी-शर्ट, बुमराहने दिलेली रिॲक्शन व्हायरल

Team India Victory Celebration: भारतीय संघाचं सेलिब्रेशन सुरु असताना एका फॅनने हार्दिकच्या हातात टी-शर्ट फेकला. दरम्यान असं काही घडलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Team India Celebration: वंदे मातरम सुरु असताना फॅनने हार्दिकच्या हातात फेकला टी-शर्ट, बुमराहने दिलेली रिॲक्शन व्हायरल
hardik pandyatwitter

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी ३३ हजारांहून अधिक लोकांनी स्टेडियमच्या आत हजेरी लावली होती. तर याहून कितीतरी पट अधिक लोकांनी भारतीय संघाच्या विजयी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. २०११ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलचा सामनाही याच मैदानावर पार पडला होता.

या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. या विजयानंतर क्रिकेट फॅन्सने वंदे मातरम गायलं होतं. यावेळीही भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला आणि विजयाचा जल्लोष वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सोहळ्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने हजारो प्रेक्षकांसह मिळून वंदे मातरम गायलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारतीय संघातील खेळाडूंनी सपोर्ट केल्याबद्दल फॅन्सचे आभार मानले, त्यावेळी रोहित शर्मासह विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि इतर खेळाडूही होते. त्यावेळी हार्दिक पंड्या हात वर करुन वंदे मातरम गात होता. नेमकं त्याचवेळी प्रेक्षकांमधून कोणीतरी हार्दिक पंड्याच्या दिशेने टी शर्ट फेकलं. हे टी शर्ट हार्दिक पंड्याने कॅच केलं आणिे फेकून दिलं. हे पाहून जसप्रीत बुमराहला हसू आवरलं नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Team India Celebration: वंदे मातरम सुरु असताना फॅनने हार्दिकच्या हातात फेकला टी-शर्ट, बुमराहने दिलेली रिॲक्शन व्हायरल
Team India Victory Parade: टीम इंडियाच्या विजय रॅलीदरम्यान अनेकांचा दम घुसमटला; मरीन ड्राइव्हला चपलांचा खच; पाहा VIDEO

हा व्हिडिओ बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडू विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून येत आहेत. दरम्यान विराट कोहली म्हणाला की, ' मी गेल्या १५ वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. मी रोहितला इतकं भावुक कधीच पाहीलं नाही. जेव्हा मी पायऱ्या चढून वर जात होतो, त्यावेळी रोहित पायऱ्या उतरत होता. आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हा क्षण मी कधीच विसरु शकणार नाही.

Team India Celebration: वंदे मातरम सुरु असताना फॅनने हार्दिकच्या हातात फेकला टी-शर्ट, बुमराहने दिलेली रिॲक्शन व्हायरल
VIDEO: Rohit Sharma च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजय , लेकाच्या विजयानंतर आईची प्रतिक्रिया काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com