Team India's Victory Parade In Mumbai Live: वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा सन्मान, BCCI ने दिला 125 कोटी रुपयांचा धनादेश

Live Updates in Marathi On Team India's Arrival At Wankhede Stadium and Marine Drive: आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. दरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंची विजयी रॅली काढली जाणार आहे.
Team India's Victory Parade In Mumbai Live: टीम इंडियाच्या  विजयी मिरवणुकीला सुरुवात
Team India's Victory Parade In Mumbai Live

Team India's Victory Parade In Mumbai: वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा सन्मान, BCCI ने दिला 125 कोटी रुपयांचा धनादेश

भारतीय संघातील खेळाडूंचा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गौरव केला. जय शहा यांनी खेळाडूंना 125 कोटींचा धनादेश दिला.

Team India Victory Parade : टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झालीय. ओपन डेक बसमध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू आहेत.

Team India Victory Parade in Mumbai: टीम इंडिया थोड्याच वेळात मरीन ड्राईव्हला पोहचणार

मुंबई विमानतळावरुन निघालेला टीम इंडियाचा ताफा हा वांद्रे वरळी सागरी सेतुवर पोहचलाय. टीम इंडियाचा ताफा थोड्याच वेळात मरीन ड्राईव्ह येथे पोहचणार आहे.

Team India Victory Parade in Mumbai :  चाहत्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

चर्चगेट स्टेशनवर प्रेक्षकांना नियंत्रित करण्यासाठी आरपीएफमार्फत सूचना दिल्या जात आहे. गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जात आहे. गर्दी अनियंत्रित होत असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केलाय.

Mumbai Airport :  टीम इंडियाचे खेळाडू आले विमानतळाबाहेर, रोहित सेनेचं जंगी स्वागत

टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावर पोहचलेत. टीम इंडियाचे खेळाडू सहकुटुंब बाहेर पडले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आता क्रिकेट चाहते प्रतिक्षा करताहेत.

Team India: वानखेडे स्टेडियमला येऊ नका; मुंबई पोलिसांचे सर्वसामान्यांना आवाहन

T20 विश्वकप जिंकवून मायदेशी परतल्यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचवली आहे. भारतीय संघाचे कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी लाखोच्या संख्येने चाहते मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर आलेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नागरिकांना एक आवाहन केलं आहे. मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमला कोणी येऊ नका असे आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने पोलिसांनी हे आवाहन केलंय.

Team India: टीम इंडिया मुंबईत दाखल, भारतीय संघाला मुंबईच्या विमानतळावर वॉटर कॅनन सॅल्यूट

टीम इंडियाचे विमान एअरपोर्टवर दाखल होताच वॉटल सॅल्युट देण्यात आलं.

 Wankhede Stadium: टीम इंडिया मुंबईत दाखल

टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर पोहचलेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची बाहेर पडण्याची प्रतिक्षा केली जातेय. लवकरच त्यांची विजयी रॅली काढण्यात येणार आहे.

 Wankhede Stadium:  वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांची तोबा गर्दी; स्टेडियमचे सगळे गेट बंद

चाहत्यांनी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्यामुळे मैदानावरील सगळे गेट बंद करण्यात आले आहे. 35 हजार सीटिंग कॅपॅसिटी असू सर्व स्टेडियम हाऊसफुल झाले आहे.

 Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांचा जल्लोष 

वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी हाऊस फूल झाले आहे. चाहते मोठ्याने जल्लोष करत आहेत. ओपन बसमधून जल्लोष रॅली काढली जाणार आहे.

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, क्रिकेटप्रेमींची तारांबळ

मुंबईत पाऊस सुरू झालाय. आज जल्लोष रॅली काढली जाणार आहे. पण पाऊस सुरू झाल्याने क्रिकेट प्रेमींची तारांबळ उडालीय.

Wankhede Stadium:  वानखेडे स्टेडियमबाहेर तोबा गर्दी! टीम इंडियाला पाहण्यासाठी तरुणांची पळापळ अन् ढकलाढकली

वानखेडे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जात आहे.त्यामुळे प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली आहे.

Team India Arrival In Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम सज्ज!

भारतीय संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम सज्ज झालं आहे. भारतीय खेळाडू ४ वाजता मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत.

Team India Meets Narendra Modi:भारतीय खेळाडूंनी घेतली नरेंद्र मोदींची भेट- PHOTO

Team India Victory Parade: टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल थोड्याच वेळात विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होणार

 Team India Meet Narendra Modi:  नरेंद्र मोदींची भेट घेऊन भारतीय संघ हॉटेलच्या दिशेने रवाना

भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर भारतीय खेळाडू हॉटेलच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Team India Meet Narendra Modi: टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष!नरेंद्र मोदींची घेणार भेट 

भारतीय खेळाडू नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Team India Victory Parade: वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघ मायदेशात परतला आहे.  भारतात आल्यानंतर विजयाचा जोरदार जल्लोष केला जाणार आहे. मुंबईत विजयी रॅली काढली जाणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com