IND vs SA : Saam tv
क्रीडा

IND vs SA : टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप; दिग्गज ३ फलंदाज तंबूत, विराट कोहली मैदानात तळ ठोकून

IND vs SA Final Match : टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप झाली आहे. टीम इंडियाचे दिग्गज ३ फलंदाज तंबूत परतले आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : टी २० विश्वचषकातील अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर मोठा पेच उभा राहिला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप झाली आहे. टीम इंडियाचे दिग्गज ३ फंलदाज तंबूत परतले आहेत. दुसरीकडे विराट कोहली मैदानात तळ ठोकून आहे. यामुळे सर्व भारतीयांचं लक्ष विराट कोहलीच्या फलंदाजीवर लागलं आहे.

टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना अमेरिकेतील बारबोडोस मैदानात सुरु आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली. या सामन्यात टीम इंडियाच्या संघात कोणताही बदल दिसला नाही. तर दक्षिण आफ्रिकेनेही संघातही कोणताही बदल केला नाही. टी २० विश्वचषक जिंकण्याचा निश्चय करत फलंदाजी उतरलेल्या टीम इंडियाचा सुरुवातीलात तीन झटके बसले आहेत.

टीम इंडियाचे तीन दिग्गज फलंदाज बाद झाले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव तंबूत परतले आहेत. पहिल्या पॉवरप्लेमध्येच दक्षिण आफ्रिकेला तीन गडी बाद करण्यास यश आलं आहे. तीन दिग्गज फलंदाज तंबूत परतल्याने भारतीयांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली मैदानात तळ ठोकून आहे.

टीम इंडियाचा विराट दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करत चौकार लगावताना दिसत आहे. तीन फलंदाज बाद झाल्यानंतर विराट कोहलीच्या खेळीने भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ९ धावांवर बाद झाला. तर ऋषभ पंत हा शून्य धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवही ३ धावांवर बाद झाले. भारताचे तीनही दिग्गज खेळाडू स्वस्तात माघारी परतले. दक्षिण अफ्रिकेच्या केशव महाराजने रोहित शर्मा आणि ऋषभ पंतला बाद केले. तर रबाडाने सूर्यकुमार यादवला बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT