indian cricket team twitter
Sports

Team India Super 8 Schedule: टीम इंडियाचं सुपर ८ फेरीचं वेळापत्रक ठरलं! या संघांसोबत होणार सामने

Team India, Super 8 Timetable: लवकरच टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचे साखळी फेरीतील तिन्ही सामने न्यूयॉर्कमध्ये झाले आहेत. तर शेवटचा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार आहे. सलग ३ सामने जिंकून भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान सुपर ८ मध्ये भारतीय संघाचे सामने कोणत्या संघासोबत होणार? जाणून घ्या.

सुपर ८ मध्ये भारतीय संघाला ३ सामने खेळायचे आहेत. हे सामने २० जून २२ जून आणि २४ जून रोजी होणार आहेत. भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना क गटात अव्वल स्थानी असलेल्या संघासोबत होणार आहे. या गटात अफगाणिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. तर वेस्टइंडिजलाही अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा पहिला सामना अमेरिका किंवा वेस्टइंडिजविरुद्ध होऊ शकतो.

भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील दुसरा सामना ड गटात दुसऱ्या स्थानी असलेल्या संघाविरुद्ध होणार आहे. ड गटात बांगलादेशचा संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे २२ जून रोजी भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होऊ शकतो.

सुपर ८ फेरीतील शेवटचा सामना २४ जून रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात क्रिकेट फॅन्सला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा थरार पाहायला मिळू शकतो. हे सर्व सामने वेस्टइंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत. हे सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janmashtami and zodiac signs: जन्माष्टमीला शनीसह ग्रह होणार वक्री; 'या' ४ राशींकडे येणार पैसाच पैसा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वधर्मीय धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे उतरवले

Accident News : कंटेनर चालकाचा अचानक यु टर्न; मोटारसायकल धडकली, एकाचा जागीच मृत्यू

Rajinikanth Movie Ticket: रजनीकांतचा जब्बरा फॅन! Coolie च्या तिकिटासाठी बारापट पैसा खर्च केला, किंमत वाचून धक्का बसेल

Maharashtra Politics: नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT