Suryakumar Yadav Saamtv
Sports

Suryakumar Yadav: 'मेरी एक टांग नकली...' जखमी सूर्यकुमारची हटके पोस्ट; चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया; पाहा VIDEO

Cricket News: भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती.

Gangappa Pujari

Suryakumar Yadav Video:

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. सध्या सूर्यकुमार यादव उपचार घेत असून तो अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेतही दिसणार नाही. एकीकडे सूर्याच्या दुखापतीने त्याचे चाहते चिंतेत असताना सुर्याने एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) घोट्याला दुखापत झाली होती. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे. इंस्टाग्रामवर त्याने एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. या व्हिडिओला सुर्याने 'वेलकम' चित्रपटातील 'मेरी एक टांग नकली' चा मजेशीर डायलॉग म्युझिक वाजताना दिसत आहे.

दुखापत चांगली नसते...

'दुखापत कधीही चांगली नसते, मी माझ्या पद्धतीने लवकरात लवकर कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत आशा करतो की तुम्ही लोक सुट्टीचा आनंद घेत असाल. प्रत्येक दिवसात लहान आनंद शोधा.." असा कॅप्शन या व्हिडिओला दिला आहे. सूर्याची हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सुर्याचा फिटनेस टीम इंडियासाठी महत्वाचा..

येत्या जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये टी -२० वर्ल्डकप २०२४ (T20 World Cup 2024) स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाची संघबांधणी सुरू आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवचे फिट असणे टीम इंडियासाठी महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT