IND vs SA 3rd ODI, Video: बॅटींगनंतर फिल्डींगमध्ये साईचा जलवा! चित्त्यासारखी झेप घेत पकडली सुदर्शनीय कॅच

India vs South Africa 3rd ODI: या सामन्यात भारताचा युवा स्टार साई सुदर्शनने एक भन्नाट झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
sai sudarshan
sai sudarshantwitter
Published On

Sai Sudarshan Catch Video:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना पार्लच्या बोलँड पार्कच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेवर ७८ धावांनी विजय मिळवला.

यासह ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. या सामन्यात भारताचा युवा स्टार साई सुदर्शनने एक भन्नाट झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

साई सुदर्शन हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. या सामन्यात त्याने पुढच्या दिशेने डाईव्ह मारत झेल टिपला. हा झेल इतका कठीण होता की, अंपयारलाही फलंदाज बाद आहे की नाही हे चेक करावं लागलं. (Sai Sudarshan Catch Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फलंदाज शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. मात्र चेंडू उंच हवेत जातो. हा झेल टिपण्यासाठी साई सुदर्शन धाव घेतो, त्याला जाणवतं की आपण चेंडूपर्यंत पोहचू शकणार नाही. त्यामुळे तो डाईव्ह मारतो आणि झेल टिपतो. हा झेलचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय..

sai sudarshan
Ind vs Sa 3rd ODI: टीम इंडियाने रचला इतिहास! असा कारनामा करणारा ठरला जगातील दुसराच संघ

हा झेल ३३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर टिपला गेला. या शानदार झेलमुळे दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हेनरीक क्लासेन २२ चेंडूत २१ धावा करत माघारी परतला. (India vs South Africa)

भारताचा जोरदार विजय..

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकअखेर ८ गडी बाद २९६ धावा केल्या.

भारतीय संघाकडून संजू सॅमसनने शतकी खेळी केली. त्याने ११४ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०८ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २१८ धावांवर संपुष्टात आला

sai sudarshan
KL Rahul Statement: 'मी खेळाडूंना हेच सांगितलं होतं की..', वनडे मालिका जिंकल्यानंतर केएल राहुलने सांगितला काय होता प्लान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com