team india saam tv
Sports

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा! पाहा संपूर्ण संघ

Team India Squad For ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात कोणत्या खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.

मात्र बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये केले जाणार आहे. भारतीय संघाचे सामने पाकिस्तानात न खेळवता युएईत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी ८ पैकी ६ संघांनी आपल्या स्क्वॉडची घोषणा केली होती. आता भारतीय संघानेही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या स्क्वॉडची घोषणा केली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात विराट कोहली, केएल राहुल आणि रिषभ पंतसारख्या स्टार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यासह जसप्रीत बुमराहचा देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी शुभमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यरला कमबॅक करण्याची संधी दिली आहे. मोहम्मद सिराजला या स्पर्धेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर अर्शदीप सिंगला देखील या संघात स्थान देण्यात आलं आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा आहे भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक...

19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई

21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी

26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर

17 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची

2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई

5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर

9 मार्च - फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)

10 मार्च - राखीव दिवस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT