Axar Patel New Born Baby saam tv
Sports

Axar Patel: रोहित शर्माने खुलासा करताच अक्षर पटेलने बाळाचा फोटो केला शेअर; नावही सांगितलं

Axar Patel New Born Baby: भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) दरम्यान त्याचा गोलंदाज अक्षर पटेलबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नुकतंच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बाबा झाला. त्यानंतर आता टीम इंडियाचा अजून एक खेळाडू बाप झाला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) दरम्यान त्याचा गोलंदाज अक्षर पटेलबद्दल मोठा खुलासा केला आहे. बॉक्सिंग डे टेस्टपूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान रोहितने मीडियाला अक्षरच्या मुलाबद्दल सांगितले.

मेलबर्नमध्ये पत्रकारांनी रोहितला अक्षर पटेलपेक्षा तनुष कोटियनची निवड करण्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी रोहितने सांगितलं की, अक्षर काही दिवसांपूर्वी बाबा झाला आहे. त्यामुळे तो सध्या त्याच्या कुटुंबासोबत आहे. रोहितच्या या माहितीनंतर अक्षरने चाहत्यांना नवजात मुलाची पहिली झलक दाखवली आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलने आपल्या मुलाचे नावही चाहत्यांना सांगितलंय.

अक्षर पटेलने मंगळवारी आपल्या नवजात मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अक्षरने सांगितलं की, त्यांनी मुलाचे नाव Haksh पटेल ठेवलं आहे. या फोटोमध्ये अक्षरने आपल्या मुलाला टीम इंडियाची जर्सी घातली आहे. ज्यावर 'चीअरिंग फॉर इंडिया' असं लिहिलेलं दिसतंय.

अक्षरने मुलाचा फोटो शेअर केला असून त्यामध्ये बाळाचा हात दोघांनी धरलेला दिसतोय. हक्षचा जन्म १९ डिसेंबरला झाला. अक्षरने या पोस्टमध्ये लिहिले आहे- "तो अजूनही लेग ऑफ साइड शोधतोय. परंतु आम्ही तुम्हा सर्वांना त्याची ओळख करून देण्यासाठी थांबू शकत नाही. हक्ष पटेल याचं स्वागत आहे.

कधी झालं होतं अक्षरचं लग्न

हक्ष अक्षर आणि त्याची पत्नी मेहा यांचं पहिलं बाळ आहे. या जोडप्याने जानेवारी 2023 मध्ये लग्न केलं होतं. भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होतं की, शेवटच्या दोन टेस्ट सामन्यांसाठी अक्षरची निवड करण्यात आली नाही कारण त्याच्या कुटुंबात नुकतंच एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे. रविचंद्रन अश्विनच्या अचानक निवृत्तीनंतर मुंबईचा ऑफस्पिनर तनुष कोटियनला दोन टेस्ट सामन्यांसाठी भारतीय टीममध्ये स्थान देण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT