team india Saam TV
Sports

Team India, Playing XI: इंग्लंडविरुद्ध प्लेइंग ११ ठरली! गेल्या सामन्यातील 'हिरो'बसणार बाहेर; दिग्गज गोलंदाजाचं होणार कमबॅक

Team India Playing 11 Prediction: या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

Team India, Playing XI:

भारतीय संघ विजयाचा षटकार मारण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. लखनऊचा स्टेडियमवर भारतीय संघाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ पराभवाची साखळी मोडत विजय संपादन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यातही हार्दिक पंड्या भारतीय संघाचा भाग नसणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी कोणाला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

असा असेल फलंदाजी क्रम..

फलंदाजी हा भारतीय संघाचा मजबूत पक्ष राहिला आहे. कारण भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले पाचही सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. संघातील प्रमुख फलंदाज केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. या सामन्यातही रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. तर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात.

या अष्टपैलू खेळाडूंना मिळू शकते संधी..

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने आतापर्यंत दमदार खेळ केला आहे. लखनऊची खेळपट्टी पाहता आर अश्विनचा देखील संघात समावेश केला जाऊ शकतो. हार्दिक पंड्या बाहेर असल्याने भारतीय संघाला अशा एका खेळाडूची गरज आहे जो गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. (Latest sports updates)

या गोलंदाजांना मिळू शकते संधी..

न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात मोहम्मद शमीचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला होता. हा त्याचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिलाच सामना होता. या सामन्यात त्याने ५ गडी बाद केले होते. त्यामुळे रोहित शर्मा त्याला बाहेर बसवण्याची रिस्क घेणार नाही.

मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जाऊ शकतं.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव/आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT