team india twitter/BCCI
Sports

IND vs BAN, Playing XI: संधी मिळूनही ठरतोय फ्लॉप; रोहित या खेळाडूला बसवणार? अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग ११

Team India Playing 11 Prediction, India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुपर ८ फेरीतील सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये आज सुपर ८ फेरीतील सामना रंगणार आहे. हा सामना अँटीग्वामध्ये रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी धुव्वा उडवला होता. भारतीय संघाला जर सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात कशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यापासून सलामी जोडीत बदलत केला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येत आहे. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं. ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसेल. तर रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना महत्वाच्या धावा करून देतोय. यापूर्वीही त्याने सलामी जोडी लवकर बाद झाल्यानंतर संघाचा डाव सावरला आहे. त्यामुळे तो या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजी करताना दिसेल. गेल्या सामन्यात सूर्याने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली होती.

शिवम दुबेला या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. त्याला मधल्या षटकांमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र तो एकही मोठी खेळी करू शकलेला नाही. त्यामुळे त्याला या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी संजू सॅमसनचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांना संघात स्थान दिले जाऊ शकते. हार्दिक पंड्याने फलंदाजीत आणि गोलंदाजी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. मात्र जडेजाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. तरीदेखील त्याचा या सामन्यासाठी संघात समावेश केला जाऊ शकतो.

फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेल आणि कुलदीप यादवचा संघात समावेश केला जाऊ शकतो. तर वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहचा समावेश केला जाऊ शकतो.

रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT