team india playing 11 prediction for icc t20 world cup 2024 team india squad announcment rohit sharma ajit agarkar amd2000 twitter
क्रीडा

Team India Squad: टीम इंडियातून या खेळाडूंचा पत्ता होणार कट! अशी असेल प्लेइंग ११

Team India Squad Announcement: आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान कशी असेल प्लेइंग ११?जाणून घ्या.

Ankush Dhavre

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी लवकरत भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. रोहित शर्मा या संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. या संघात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, टी-२० वर्ल्डकपबाबत चर्चा करण्यासाठी रोहित शर्माने अजित आगरकरांची भेट घेतली आहे. ज्यात सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाजांबाबत चर्चा करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

भारतीय संघात यष्टीरक्षण आणि सलामीवीर फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी चुरशीची लढत सुरु आहे. या संघात अनुभवी खेळाडूंना स्थान मिळणार? की युवा खेळाडूंना प्राधान्य दिलं जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसन, दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत हे पर्याय आहेत. या तिघांपैकी रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांना भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

तर गोलंदाजी आक्रमणाची धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या हाती असणार आहे. यासह मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना संघात स्थान दिले जाऊ शकते. मोहम्मद सिराजला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. असं असलं तरीदेखील त्याला अनुभवाच्या बळावर संघात स्थान दिले जाऊ शकते. यासह फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाचा संघात समावेश केला जाऊ शकतो

आगामी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा असू शकतो भारतीय संघ..

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT