team india yandex
Sports

Team India Plan: इंग्लंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडियाचा मास्टरप्लान तयार! कोचने केला मोठा खुलासा

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs England 2nd Test:

भारतीय संघाला पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विशाखापट्टनममध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाने कसून सराव करायला सुरुवात केली आहे.

पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांच्या अडकल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी खास प्लान केला आहे.

भारतीय संघाचा खास प्लान...

फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना भारतीय फलंदाज स्विप आणि रिव्हर्स स्विप शॉट खेळणं टाळतात. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय फलंदाज स्विप शॉट खेळण्याचा कसून सराव करताना दिसून आले. पहिल्या कसोटीत एकट्या रोहितला सोडलं तर उर्वरित कुठलाच फलंदाज स्विप शॉट खेळताना दिसून आला नव्हता.

इंग्लंडकडून ओली पोपने भारतीय फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत १९६ धावांची खेळी केली. त्याने फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना स्विप आणि रिव्हर्स स्विपचा वापर केला.या खेळीच्या बळावर त्याने इंग्लंडची धावसंख्या ४०० धावांच्या पार पोहचवली. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी २३१ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव २०२ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. (Cricket news in marathi)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी शुभमन गिल, रजत पाटीदार स्विप शॉट खेळण्याचा सराव करताना दिसून आले. दुसऱ्या सामन्यासाठी निवड झालेला सरफराज खान देखील फलंदाजीचा सराव करताना दिसून आला आहे.

तसेच याबाबत बोलताना फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड म्हणाले की,' स्विप आणि रिव्हर्स स्विप शॉट खेळण्यासाठी तु्म्हाला या शॉट्सचा सराव करण्याची गरज आहे. आम्ही पारंपारिक क्रिकेट खेळतो. सरळ बॅट आणि पायांचा वापर करुन खेळणं ही आमची मजबूत बाजु आहे. आम्हाला यात आणखी सुधारणा करावी लागणार आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Thane Crime: डिलिव्हरी बॉयला ड्रग्ज विकताना अटक, ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

UPSC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; UPSC ने जारी केली भरती; अर्ज कसा करावा?

Dhananjay Mundhe : दारू पिऊन सुसाट चालवली गाडी, धनंजय मुंडेंच्या समर्थकाचा प्रताप; VIDEO व्हायरल

Pune Rave Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खेवलकरांची उच्च न्यायालयात धाव, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT