Team India injuries warning bell saam tv
Sports

Ishan Kishan: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, अभिषेकनंतर इशान किशनही जखमी; प्लेईंग ११ मध्ये कोण खेळणार?

Team India injuries warning bell: टीम इंडियाला सध्या दुखापतींचं ग्रहण लागलंय. अभिषेकच्या दुखापतीनंतर आता इशान किशनही जखमी झाला असून संघासाठी ही मोठी चिंता निर्माण झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गुरुवारी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि नामिबिया यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणी वाढल्याचं चित्र दिसून येतंय. टीम इंडियाचे खेळाडू अगोदरच अनफीट आहेत. अशातच अजून एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाच्या चिंतेत भर पडलीये.

समोर आलेल्या माहितीनुसार, सामन्याच्या एक दिवस आधी दिल्लीमध्ये सराव करताना इशान किशनच्या डाव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे आजच्या नामिबियाविरूद्धच्या सामन्यात तो खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.

जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने झाली दुखापत

जसप्रीत बुमराहने नेट्समध्ये केलेल्या वेगवान यॉर्करने इशान किशनच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली. यावेळी त्याला बॉल इतका जोरात लागला की तो वेदनेने जोरात ओरडला. त्याने काही काळासाठी प्रॅक्टिस थांबवली देखील होती. दरम्यान यामुळे नामिबियाविरुद्धच्या सामन्यात किशन खेळू शकेल की नाही हे सध्या स्पष्ट करण्यात आलं नाही.

ओपनर अभिषेक शर्माच्या प्रकृतीबाबत टीम इंडियाने संकटात आहे. अभिषेकला नुकतंच पोटाशी संबंधित आजारामुळे दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. मात्र आता त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय. मात्र लगेच तो आजच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल का हे अजून टीम मॅनेजमेंटकडून स्पष्ट करण्यात आलं नाही.

मुळात अभिषेक आजारी असूनही अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळला. मात्र त्याला त्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्या सामन्यात तो फिल्डींगलाही उतरला नव्हता.

जर इशान किशन आणि अभिषेक शर्मा दोघंही पूर्णपणे फीट नसतील तर टीम मॅनेजमेंटला प्लेईंग ११ मध्ये बदल करावे लागू शकतात. यावेळी संजू सॅमसन पर्याय म्हणून उपलब्ध आहे तर वॉशिंग्टन सुंदरला ओपनिंगला खेळवणार असल्याची चर्चा आहे.

इशान किशनची दुखापत देखील महत्त्वाची आहे कारण तो विकेटकीपिंग आणि फलंदाजी या दोन्ही गोष्टी करतो. जर त्याच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली असेल तर विकेटकीपिंग आणि फलंदाजी दोन्हीमध्ये बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT