SA vs AFG: धकधक वाढवणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय; दुसऱ्या सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर गेम पलटला

T20 World Cup SA vs AFG: प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने १८७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्ताननेही १८७ धावा केल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १७ धावा केल्या, यामुळे सामना बरोबरीत सुटला. दोनदा सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला.
T20 World Cup SA vs AFG
South Africa players celebrate after sealing victory against Afghanistan in a dramatic double Super Over match.saam tv
Published On

टी-२० वर्ल्ड कपमधील दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना खूपच रोमांचक ठरला. या सामन्याने अनेक क्रिकेट चाहत्यांची धकधक वाढवली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १८७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाला २० षटकात १८७ धावाच करता आल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. पण त्याचही दोन्ही संघांनी बरोबरी केली. त्यामुळे हा सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यामुळे सामना रोमांचकारी बनला.

२ सुपर ओव्हरमुळे चाहत्यांची धकधक वाढली

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत १७ धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा दक्षिण आफ्रिकेनंही १७ धावा केल्या. त्यामुळे हा सामना पुन्हा अनिर्णित राहिला. तर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी केली. यात आफ्रिकेच्या संघाने २३ धावा केल्या. या २४ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ १९ धावा करू शकला. अखेरच्या चेंडूवर अफगाणिस्तानचा फलंदाज गुरबाज बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेनं ऐतिहासिक विजय मिळवला.

गुरबाजची विक्रमी खेळी

रहमानउल्लाह गुरबाजने टी-२० वर्ल्डकपमधील त्याची सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने ४२ चेंडूत ८४ धावा केल्या. २०० च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी करत त्याने आपल्या खेळीत ७ षटकार मारले. रहमानुल्लाह बाद झाल्यानंतर रशिद खान आणि अजमतुल्लाह जजईनेही शानदार फलंदाजी केली. २० व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडू आधी अफगाणिस्तानच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येची बरोबरी केली होती.

डी कॉक आणि रिकेल्टन यांच्या खेळाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने १८७ धावा केल्या.प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत १८७ धावा केल्या. यात दोन फलंदाज क्विंटन डी कॉक आणि रायन रिकेल्टन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनीही आपले अर्धशतक पूर्ण केले. डी कॉकने ४१ चेंडूत ५९ धावा केल्या, तर रायन रिकेल्टनने केवळ २८ चेंडूत २१७ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ६१ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com