indian test cricket team yandex
Sports

WTC Points Table: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर WTC Final मध्ये पोहोचणं कठीण?

WTC Points Table:दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या मालिकेनंतर कसं आहे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकून गेल्या ११ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. आता भारतीय संघाचं लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्यावर असणार आहे. जसजशी या स्पर्धेची फायनल जवळ येत आहे,तसं या स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याचं समीकरण स्पष्ट होऊ लागलं आहे.

भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेने वेस्टइंडिजविरुद्ध विजय मिळवल्यानंतर गुणतालिकेचं समीकरण बदललं आहे. या मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा भारतीय संघाला फारसा फटका बसलेला नाही. मात्र दक्षिण आफ्रिका संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला २ सामने जिंकता आले आहेत.

तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान १ सामना ड्रॉ राहिला आहे. यासह हा संघ १६ गुणांसह पाचव्या स्थानी पोहोचला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या फायनलमध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत. इथून पुढे या संघाला ६ सामने जिंकावे लागणार आहेत. जर एकही सामना गमावला किंवा ड्रॉ झाला, तर दक्षिण आफ्रिकेचं टेन्शन वाढेल.

टीम इंडिया जाणार फायनलमध्ये?

भारतीय संघाने आतापर्यंत २ वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र दोन्ही वेळेस या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी भारतीय संघाकडे तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. यासह ऑस्ट्रेलियालाही फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारतीय संघाची विजयाची सरासरी ही ६८.५१ इतकी आहे. तर ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ६२.५० इतकी असणार आहे. भारतीय संघाला इथून पुढे बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील ७ सामने जिंकले, तर भारतीय संघाचं तिसऱ्यांदा फायनल खेळण्याचं तिकीट कन्फर्म होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

SCROLL FOR NEXT