WI vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा वेस्टइंडीजला दणका! दुसरी कसोटी जिंकत मालिका घातली खिशात

West Indies vs South Africa, 2nd Test Result: वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे.
WI vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा वेस्टइंडीजला दणका! दुसरी कसोटी जिंकत मालिका घातली खिशात
south africa cricket teamtwitter
Published On

वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत शानदार विजय मिळवला आहे. यासह कसोटी मालिका १-० ने आपल्या नावावर केली आहे. (WI vs SA 2nd Test)

दक्षिण आफ्रिकेचा विजय

मालिकेतील दुसरा सामना गयानातील प्रोविंडेस स्टेडियममध्ये पार पडला. या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दोन्ही संघांना पहिल्या डावात हवी तशी कामगिरी करता आली नाही.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या १६० धावांवर आटोपला. त्यानंतर वेस्टइंडीजचा डाव अवघ्या १४४ धावांवर आटोपला.

WI vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा वेस्टइंडीजला दणका! दुसरी कसोटी जिंकत मालिका घातली खिशात
IND vs BAN: टीम इंडियाचा हा फलंदाज बांगलादेशला एकटा नडणार! रोहित - विराटपेक्षा खतरनाक आहे रेकॉर्ड

पहिल्या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांकडून बरोबरीची लढत पाहायला मिळाली होती. मात्र यावेळी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवर आटोपला. त्यामुळे वेस्टइंडीजला हा सामना जिंकण्यासाठी २६३ धावांचं आव्हान होतं.

WI vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा वेस्टइंडीजला दणका! दुसरी कसोटी जिंकत मालिका घातली खिशात
Team India News: या २ दिग्गज भारतीयांची कारकिर्द जवळजवळ संपली! आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही

आव्हानाचा पाठलाग करताना वेस्टइंडीजचे फलंदाज अपयशी

आव्हान तसं मोठं नव्हतं. मात्र वेस्टइंडीजला हवी तशी सुरुवात करता आली नाही. अवघ्या १२ धावसंख्येवर वेस्टइंडीजला पहिला धक्का बसला. त्यानंतर ५४ धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. १०४ धावसंख्या असताना वेस्टइंडीजचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. वेस्टइंडीजचा संघ २२२ धावांवर गारद झाला.

या धावांचा बचाव करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि केशव महाराजने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. यासह डेन पिट्स आणि वियान मुल्डरने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com