rohit sharma twitter/bcci
Sports

IND vs AUS Record: भारताकडे ३२ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी! बुमराह- सिराजवर जबाबदारी

India vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार अॅडलेडच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून प्रथम फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने भारतीय संघाला १८० धावांपर्यंत मजल मारता आली.

याच मैदानावर खेळताना डे-नाईट कसोटीत भारतीय संघाचा डाव अवघ्या ३६ धावांवर आटोपला होता. तर या मैदानावर खेळताना ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या ८२ धावांवर आटोपला होता.

भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी

याच मैदानावर खेळताना वेस्टइंडिजने ऑस्ट्रेलियाला १४५ धावांवर ऑलआऊट केलं होतं. तर भारताने ऑस्ट्रेलियाला याच मैदानावर खेळताना, १४५ धावांवर ऑल आऊट केलं होतं. ३२ वर्षांपूर्वीच म्हणजे १९९२ मध्ये मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली खेळताना हा कारनामा केला होता.आता भारतीय संघाला हा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी आहे.

भारतीय संघाची घातक गोलंदाजी

या मालिकेतील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव १५० धावांवर आटोपला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १०४ धावांवर आटोपला. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळतोय.

मिचेल स्टार्कने गोलंदाजी करताना, सर्वाधिक ६ गडी बाद केले. भारताकडून बुमराह आणि सिराजसारखे गोलंदाज आहेत, जे ऑस्ट्रेलियाला पाणी पाजू शकतात. ऑस्ट्रेलियाचा डाव जर १४५ धावांपेक्षा कमी धावांवर आटोपला, तर नक्कीच ३२ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT