AUS vs IND : पिंक बॉल टेस्टमध्ये नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, रोहितने प्लेईंग ११ मध्ये केले ३ मोठे बदल

AUS vs IND : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टेस्ट सामना सुरु झाला आहे. टीम इंडियाचा अ‍ॅडलेड ओव्हलमध्ये '36' चा आकडा आहे.
rohit sharma
rohit sharmasaam tv
Published On

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या ठिकाणी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येतेय. आजपासून अ‍ॅडलेडवर या सिरीजमधील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये ३ बदल करण्यात आले आहेत.

टीम इंडियामध्ये कोणते ३ मोठे बदल

पर्थ टेस्टमध्ये खेळलेले वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांना दुसऱ्या टेस्टमधून बाहेर बसवण्यात आलंय. या खेळाडूंच्या जागी रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे यांना टीममध्ये संधी देण्यात आली आहे

rohit sharma
IND vs AUS Record: पिंक बॉल कसोटीत कोण कोणावर भारी? कसा राहिलाय IND vs AUSचा रेकॉर्ड?

ॲडलेड टेस्टमध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

rohit sharma
Rohit Sharma PC: दुसऱ्या कसोटीआधी रोहितचा धाडसी निर्णय! 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडणार

दुसऱ्या टेस्टवर चाहत्यांची नजर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टेस्ट सामना ॲडलेड ओव्हलमध्ये खेळवण्यात येतोय. ही टेस्ट डे-नाईट असणार आहे. पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर १-० अशी आघाडी घेतली आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 रन्सने पराभव केला. पहिल्या टेस्टमधील विजयानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावलं होतं. आता टीम इंडियाच्या नजरा ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्ट मॅच जिंकण्यावर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com