IND vs AUS Record: पिंक बॉल कसोटीत कोण कोणावर भारी? कसा राहिलाय IND vs AUSचा रेकॉर्ड?

India vs Australia Pink Ball Test Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये होणारा दुसरा कसोटी सामना हा पिंक बॉल कसोटी सामना असणार आहे.
IND vs AUS Record: पिंक बॉल कसोटीत कोण कोणावर भारी? कसा राहिलाय IND vs AUSचा रेकॉर्ड?
ind vs austwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर रंगला होता.

या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. तर दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा कमबॅक करताना दिसून येणार आहे. हा सामना डे- नाईट कसोटी सामना असणार आहे.

IND vs AUS Record: पिंक बॉल कसोटीत कोण कोणावर भारी? कसा राहिलाय IND vs AUSचा रेकॉर्ड?
IND W vs AUS W: आजपासून भारत- ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरुवात! केव्हा, कुठे अन् किती वाजता पाहता येणार?

हा सामना डे-नाईट कसोटी सामना असल्यामुळे, हा सामना पिंक बॉलने खेळला जाणार आहे. दरम्यान पिंक बॉल कसोटीत कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

IND vs AUS Record: पिंक बॉल कसोटीत कोण कोणावर भारी? कसा राहिलाय IND vs AUSचा रेकॉर्ड?
IND W vs AUS W: आजपासून भारत- ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरुवात! केव्हा, कुठे अन् किती वाजता पाहता येणार?

भारताकडे ४ सामने खेळण्याचा अनुभव

पहिला पिंक बॉल कसोटी सामना २०१५ मध्ये खेळला गेला होता. हा सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत पहिला पिंक बॉल कसोटी सामना जिंकण्याचा कारनामा केला होता.

या ९ वर्षात भारतीय संघाला ४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश संघाचा सामना केला आहे. भारताला केवळ ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर उर्वरीत सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.

IND vs AUS Record: पिंक बॉल कसोटीत कोण कोणावर भारी? कसा राहिलाय IND vs AUSचा रेकॉर्ड?
IND vs AUS: फॅन्सला नो एन्ट्री! BGT सुरु असताना घेतला मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

कसा राहिलाय ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड?

पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजयाचा रेकॉर्ड हा दमदार राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण १२ कसोटी सामने खेळले आहेत.

यादरम्यान ऑस्ट्रेलियाने ११ सामने जिंकले आहेत. तर एकमेव कसोटी सामना वेस्टइंडीजविरुद्ध गमवावा लागला होता. २०२४ मध्ये वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला होता.

भारताला ३६ धावांवर केलं होतं ऑलआऊट

पिंक बॉल कसोटी हे भारतासमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना, अॅडिलेडच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताचा डाव ३६ धावांवर आटोपला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com