virat kohli with rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित, विराट तुमचा निर्णय मागे घ्या; विश्वविजेत्या संघाचा दारुण पराभव होताच चाहत्यांना झाली 'रो-को'ची आठवण

team india fans demands : झिम्बाब्वेविरुद्ध विश्वविजेत्या संघाचा दारुण पराभव झाला आहे. विश्वविजेता टीम इंडियाचा पराभव होताच चाहत्यांना निवृत्ती जाहीर करणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीची आठवण झाली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान हरारेमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावं लागलं. झिम्बाब्वेने विश्वविजेत्या टीम इंडियाला धूळ चारली आहे. विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वे दुबळा सारखा संघ टीम इंडियाला भारी पडला आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली आठवण झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली तुमचा निर्णय मागे घ्या, असा सूर चाहत्यांमध्ये उमटताना दिसत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीने टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या दोघांनी घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठीही संघातील खेळाडूंनी सल्ला दिला. मात्र, दोघेही निवृ्त्तीच्या निर्णायवर ठाम होते.

रोहित आणि विराट कोहली हे दोन्ही स्टार खेळाडू फक्त वनडे आणि टेस्ट क्रिकेट खेळणार आहेत. विश्वचषक स्पर्धेनंतर या दोन्ही खेळाडूंनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. विश्वचषक जिंकल्यानंतर दोघांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, दोघांच्या निर्णयाने अनेक चाहते भावुक देखील झाले होते.

एकीकडे दोन्ही दिग्गज खेळाडूंनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर दुसरीकडे स्टार खेळाडूंच्या पश्चात ज्यूनिअर टीम इंडियाचा दारुण पराभव झालाय. यामुळे चाहत्यांना टीम इंडियाच्या भविष्याची चिंता लागली आहे. झिम्बाब्वे सारख्या संघाकडून टीम इंडिया पराभूत होताच चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीची आठवण झाली आहे. रोहित आणि विराट तुमचा निर्णय मागे घ्या, अशी विनंती चाहत्यांकडून केली जात आहे. चाहत्यांच्या विनंतीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टीम इंडियाचा १३ धावांनी पराभव

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे संघादरम्यान झालेल्या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडिया १३ धावांनी पराभूत झाली. टीम इंडियाने या सामन्याआधी सातत्याने १२ सामने जिंकले आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. झिम्बाब्वे संघाने टीम इंडियाला ११६ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली. शुभमन गिल वगळता एकही फलंदाज मैदानावर फारकाळ टिकू शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

SCROLL FOR NEXT