IND vs ZIM Live Score, 1st T20I: झिम्बाब्वेसमोर भारताची 'युवा सेना' ढेर; Team India ला दिसऱ्यांदा दिली मात

India vs Zimbabwe : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत झिम्बाब्वेने भारतावर १३ धावांनी विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेने दिलेल्या ११६ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील एकाही संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
IND vs ZIM Live Score, 1st T20I
IND vs ZIM Live Score, 1st T20ISaam Digital

टी-२० विश्वचषकानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिलाच सामन्यात भारतीय युवा संघाला दारून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. झिम्बाब्वेने दिलेल्या ११६ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील एकाही संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शुभमन गिल वगळता एकही फलंदाज फारकाळ मैदानावर टीकू शकला नाही. शेवटच्या शटकात १७ धावांची गरज होती. अखेर झिम्बाब्वेने भारताचा १३ धावांनी पराभव केला.

IND vs ZIM Live Score, 1st T20I
Ind vs Zim Playing XI : झिम्बाब्वेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग ११; शुभमन गिलनं ३ खेळाडूंची नावेही सांगितली

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनीही चांगली कामगिरी करत झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाला 20 षटकात 9 गड्यांच्या बदल्यात केवळ 115 धावाच करता आल्या.

झिम्बाब्वेकडून क्लाईव्ह मदंडेने सर्वाधिक नाबाद २९ धावा केल्या. तर डिऑन मायर्सने २३ धावांचं योगदान दिलं. ब्रायन जॉन बेनेटनेही 15 चेंडूत 22 धावा केल्या. दुसरीकडे टीम इंडियाकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने 2 आणि मुकेश कुमारआवेश खान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

IND vs ZIM Live Score, 1st T20I
Team India Victory Parade| हुश्शsss.. मुंबईवरील चेंगराचेंगरीचं संकट टळलं! टीम इंडियाच्या मुंबईतील विजयी यात्रेतील गर्दी मॅनेज करण्यात यंत्रणा फेल

झिम्बाब्वेने ११५ धावांचं दिलेलं सोप्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खबाब झाली. पॉवर प्लेमध्येच टीम इंडियाने 4 विकेट गमावल्या आणि त्यानंतर संघाच्या या सुरुवातीच्या धक्क्यातून एकही फलंदाज सावरू शकला नाही. त्यामुळे 116 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला केवळ 102 धावाच करता आल्या. इंडियाकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 31 धावा केल्या. याशिवाय एकाही योग्य फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा पराभव स्वीकारावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com