Sandgyachi Bhaji Recipe : सांडग्यांची भाजी अस्सल गावरान ठसका, मिळमिळीत जेवणाची वाढवेल चव

Shreya Maskar

सांडग्यांची भाजी

सांडगे बनवण्यासाठी हरभरा डाळ, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, धणे, जिरे, आलं, लसूण, हिरवी मिरची, भाजलेले सुकं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो इत्यादी साहित्य लागते.

Sandgyachi Bhaji | yandex

डाळ मिक्स करा

सांडगे बनवण्यासाठी सर्वप्रथम हरभरा, तूर, मूग, मसूर, उडदाची डाळ १ तास पाण्यात भिजवा. जेणेकरून त्या चांगल्या मऊ होतील.

Sandgyachi Bhaji | yandex

हिरवी मिरची

१-२ तासांनी डाळींमधील पाणी काढून त्या एका बाऊलमध्ये टाका आणि त्यात धणे, जिरे, आलं, लसूण, हिरवी मिरची घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा.

Green chillies | yandex

कोथिंबीर

तयार वाटणात तिखट, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करा. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून कुकरमध्ये वाफवून घ्या. तुम्ही हे तेलात तळू देखील शकता.

Coriander | yandex

भाजलेला कांदा

भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेला कांदा, आलं, लसूण, जिरे, कोथिंबीर घालून पुन्हा मिक्सरला बारीक पेस्ट करा.

Roasted onion | yandex

मसाले

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून चांगला परतून घ्या. यात वाटलेला मसाला मिक्स करा. त्यानंतर तुमच्या आवडीचे मसाले टाका.

Spices | yandex

उकडलेले सांडगे

भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये उकडलेले सांडगे घाला. ५ मिनिटांनी गॅस बंद करून त्यात कोथिंबीर टाका.

sandage | yandex

भाकरी - भात

सांडग्यांची भाजीचा भाकरी - भातासोबत आस्वाद घ्या. हा पदार्थ गावाकडे आवर्जून बनवला जातो.

Sandgyachi Bhaji | yandex

NEXT :  भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...