team india can become number 1 in latest icc odi rankings if they beat australia by 2-1 in upcoming odi series Saam TV
Sports

ICC ODI Ranking: वर्ल्डकपआधीच टीम इंडियाकडे नंबर १ बनण्याची संधी! ऑस्ट्रेलियाविरूद्ध करावं लागेल हे काम

India vs Australia ODI Series: भारतीय संघाकडे पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहचण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

ICC ODI Ranking:

भारतीय संघाने नुकताच आशिया चषक जिंकला आहे. मात्र या विजयानंतरही भारतीय संघ रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी येऊ शकलेला नाही.

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

या मालिकेदरम्यान भारतीय संघाकडे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला पछाडत नंबर १ वर येण्याची संधी असणार आहे. दरम्यान जाणून घ्या कसं असेल नंबर १ बनण्यासाठीचं समीकरण.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये २२ सप्टेंबरपासून ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. भारतीय संघाला या मालिकेत विजय मिळवण्यासाठी २-१ ने विजय मिळवावा लागणार आहे.

सध्या नंबर १ साठी पाकिस्तान,भारत ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. ५ सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीचे २ सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने पहिलं स्थान मिळवलं होतं. मात्र पुढील ३ सामन्यांमध्ये झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला नंबर १ स्थान गमवावं लागंल आहे.

भारतीय संघ सध्या वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.

भारतीय संघाचे रेटिंग पॉइंट्स ११४ आहेत. भारतीय संघाने जर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे तिन्ही सामने जिंकले, भारतीय संघ नंबर १ बनेल. तसेच ही मालिका २-१ ने जिंकली तरी देखील भारतीय संघाकडे नंबर १ बनण्याची संधी असणार आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या २ वनडेसाठी असा आहे भारतीय संघ:

केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन,सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, वाशिंगटन सुंदर 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT