IND vs AUS 2023, Schedule: आशिया चषकानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूद्ध करणार दोन हात; पाहा मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

Schedule And Squad For Australia Tour Of India : पाहा भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक.
Australia tour of india full schedule and squads ind vs aus timetable cricket news in marathi
Australia tour of india full schedule and squads ind vs aus timetable cricket news in marathiSaam tv news

Australia Tour Of India Schedule And Squad:

आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. नुकताच ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत ३-२ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेतून दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Australia tour of india full schedule and squads ind vs aus timetable cricket news in marathi
IND vs SL, Asia Cup 2023: टीम इंडियासोबत आशिया चषकाची ट्रॉफी उंचावणारा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण?

केव्हा आणि कुठे रंगणार सामने?

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील सामने २२ ते २७ सप्टेंबर दरम्यान इंदुर, राजकोट आणि मोहालीमध्ये रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. यासह दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला ग्लेन मॅक्सवेल देखील या मालिकेतून कमबॅक करेल. (Latest sports updates)

असे आहे वनडे मालिकेचे वेळापत्रक..

पहिला वनडे सामना: २२ सप्टेंबर, दुपारी १:३० वाजता, पंजाब क्रिकेट असोशिएशन, मोहाली

दुसरा वनडे सामना: २४, सप्टेंबर , दुपारी १:३० वाजता, होल्कर क्रिकेट स्टेडियम, इंदुर

तिसरा वनडे सामना: २७ सप्टेंबर, दुपारी १:३० वाजता सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन, राजकोट

वनडे मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ:

पॅट कमिंस (कर्णधार), सीन एबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

Australia tour of india full schedule and squads ind vs aus timetable cricket news in marathi
Ishan Kishan Funny Video: आक्रमक ईशानचा मजेशीर अंदाज! किंग कोहलीची नक्कल केल्याचा व्हिडिओ व्हायरल

या मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com