भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता.
तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं. आता तिसऱ्या मालिकेसाठी भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे. रोहितसह संपूर्ण संघ ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे. मात्र यशस्वी जयस्वालला हॉटेलमध्येच ठेवलं गेलं. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
बुधवारी (११ डिसेंबर) भारतीय खेळाडूंनी सकाळीच अॅडलेडमधून ब्रिस्बेनला जाण्यासाठी फ्लाईट पकडली. मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनच्या गाबामध्ये होणार आहे. हा सामना १४ ते १८ डिसेंबरदरम्यान खेळला जाणार आहे.
मुख्य बाब म्हणजे एअरपोर्टला जाणारी बस यशस्वी जयस्वालला न घेताच निघाली. यामागे रोहित शर्माचा हात आहे.यशस्वी जयस्वालने हॉटेलमधून निघण्यास उशीर केला. त्यामुळे रोहितने त्याला न घेताच हॉटेलला जाण्याचा निर्णय घेतला.
जर त्याच्यासाठी थांबले असते, एका खेळाडूच्या चुकीमुळे सर्वांची फ्लाईट लेट झाली असती. त्यामुळेच रोहितने त्याला घेऊन न जाताच पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
क्रिकट्रॅकरच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा यशस्वी जयस्वालच्या अशा वागणुकीमुळे नाराज झाला होता. स्थानिक वेळेनुसार भारतीय संघ सकाळी ८:३० वाजता एअरपोर्टला जाण्यासाठी निघणार होता.
कारण १०:०५ ला ब्रिस्बेनला जाणारी फ्लाईट होती. ८:२० पासून भारतीय खेळाडू बसमध्ये चढू लागले. बस गेटच्या जवळ पोहोचली तेव्हाही रोहित वाट पाहत होता. रोहितने काही मिनिट चर्चा केली आणि पुन्हा बसमध्ये चढला. ८:५० ला बस एअरपोर्टच्या दिशेने रवाना झाली.
बस निघून गेल्यानंतर ५ मिनिटांनी यशस्वी जयस्वाल खाली आला. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत तो कारमध्ये बसून एअरपोर्टच्या दिशेने निघाला. यशस्वीने भारतीय खेळाडूंसह ब्रिस्बेनसाठी फ्लाईट पकडली.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.