ind vs pak
ind vs pak  saam tv
क्रीडा | IPL

India vs Pakistan Cricket Match: गुड न्युज! भारत - पाकिस्तान संघ ५ सामने खेळण्यासाठी येणार आमने सामने; जाणून घ्या केव्हा

Ankush Dhavre

India vs Pakistan: यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ५ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

तर १५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यासह भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ५ सामने खेळण्यासाठी आमने सामने येऊ शकतात. कसं ते जाणून घ्या.

आशिया चषक स्पर्धेत येणार आमने सामने...

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया चषक स्पर्धेत आमने सामने येणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन सप्टेंबर महिन्यात केले जाणार आहे. मात्र हे सामने केव्हा आणि कुठे रंगणार याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नाहीये.

यावेळी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन वनडे फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. तसेच या स्पर्धेत ६ संघ सहभाग घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका,अफगाणिस्थान, बांगलादेश आणि नेपाळ या संघांचा समावेश असणार आहे. हे ६ संघ २ गटात विभागले जाणार आहेत.

भारतीय संघ ज्या ग्रुपमध्ये असणार आहे. त्याच ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ हे दोन संघ असू शकतात. या स्पर्धेच्या फॉरमॅटनुसार प्रत्येक संघाला आपल्या ग्रुपमध्ये असलेल्या संघांसोबत १-१ सामना खेळावा लागणार आहे.

तर सुपर ४ फेरीत राउंड रॉबिन फॉरमॅटनुसार ६ सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. (Latest sports updates)

आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर भारतीय संघ सुपर ४ मध्येही प्रवेश करणार. इथे देखील भारत - पाकिस्तान सामना होऊ शकतो. तसेच दोन्ही संघांचा फॉर्म पाहता हेच दोन्ही संघ अंतिम फेरीत देखील आमने सामने येऊ शकतात. याचा अर्थ असा की, आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तान संघ ३ वेळेस आमने सामने येतील.

ही स्पर्धा झाल्यानंतर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना भारतीय संघासोबत होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

या स्पर्धेत देखील दोन्ही संघ तुफान फॉर्ममध्ये राहिले तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सेमीफायनल आणि फायनलचा सामना देखील पाहायला मिळू शकतो. त्यामुळे दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना भारत- पाकिस्तान या दोन्ही संघांचे ५ किंवा त्यापेक्षा अधिक सामने पाहायला मिळू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : सोलापूर जिल्ह्यातील भैरववाडी ग्रामपंचायतीने टाकला मतदानावर बहिष्कार

Pudina Sarbat: थंडगार! पुदिना सरबत बनविण्याची सोपी रेसिपी

Konkan Politics: किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गट भाजपमध्ये रंगला कलगीतुरा; अखेर उदय सामंतांनी सांगितला ठावठिकाणा

Bribe Trap : पानटपरी चालकाकडून लाच; पोलीस कॉन्स्टेबल ताब्यात

Effects of Burger: महिनाभर दररोज बर्गर खाल्लयावर काय होईल?

SCROLL FOR NEXT