MI VS RCB Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्स संघाचा (Mumbai Indians) संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) फॉर्ममध्ये परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने तुफानी अर्धशतकी खेळी करत मुंबईला एकतर्फी विजय मिळवून दिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले होते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने वन साईड फलंदाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला.
या विजयानंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत. (Suryakumar Yadav Memes)
सूर्यकुमार यादवने या सामन्यात ३५ चेंडूंचा सामना करत ८३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार मारले. त्याला ईशान किशन आणि नेहाल वढेराने चांगली साथ दिली.
सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांच्यात १४० धावांची पार्टनरशिप झाली. या विजयासह मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया...
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १९९ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून ग्लेन मॅक्सवेलने ३३ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले. तर कर्णधार फाफ डू प्लेसिसने त्याला चांगली साथ देत ६५ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. तर शेवटी दिनेश कार्तिकने ४ चौकार आणि १ षटकार खेचत ३० धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून ईशानने चांगली सुरुवात केली होती. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारत ४२ धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातही फ्लॉप ठरला. तो अवघ्या ७ धावा करत माघारी परतला.
मिस्टर ३६० सूर्यकुमार यादवने ७ चौकार आणि ६ षटकार खेळत सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. तर नेहाल वढेराने नाबाद ५२ धावांची खेळी केली. मुंबईने या सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. य विजयासह मुबंईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.