MI vs RCB Match Updates: रोहितची एक चूक अन् आरसीबीने संधी साधली; घरच्या मैदानावरच मुंबईची धुलाई

MI vs RCB Score: सुरूवातीला दोन धक्के बसल्यानंतर आरसीबीचा संघ बॅकफूटवर गेला. मात्र, रोहितच्या एका चुकीने त्यांना पुन्हा सामन्यात वापसी करण्याची संधी मिळाली.
MI vs RCB Match Updates
MI vs RCB Match UpdatesIPL 2023/Twitter

MI vs RCB Match Updates: आरसीबीविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीला मुंबईने पावर प्लेमध्येच दोन मोठे धक्के दिले. डावखुरा गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फने आधी विराट कोहली आणि त्यानंतर अनुज रावतला झटपट माघारी पाठवलं. (Latest sports updates)

विराटला भोपळाही फोडता आला नाही. तर अनुज रावत ६ धावा काढून बाद झाला. सुरूवातीला दोन धक्के बसल्यानंतर आरसीबीचा संघ बॅकफूटवर गेला. मात्र, रोहितच्या एका चुकीने त्यांना पुन्हा सामन्यात वापसी करण्याची संधी मिळाली.

MI vs RCB Match Updates
Nitish Rana Fined : कोलकाता जिंकला, पण राणा चुकला; नितीशला ही मोठी चूक पडली महागात

कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या ४१ चेंडूत ६५ धावा, त्याला मॅक्सवेलने दिलेली ६४ धावांची साथ आणि शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी धावांचं २०० आव्हान ठेवलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने पॉवरप्लेमध्येच आरसीबीला दोन मोठे धक्के दिले होते.

डावखुरा गोलंदाज जेसनबेहरनडॉर्फने कोहली आणि रावतला बाद करत आरसीबीला बॅकफूटवर ढकललं होतं. मात्र, रोहित शर्माचा एक निर्णय चुकला. त्याने पावर प्लेमध्ये लेगस्पीनर पियुष चावलाच्या हाती चेंडू सोपवला. या षटकात मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिसने आक्रमण केलं. तेथूनच सामन्याला कलाटणी मिळाली. (Latest Marathi News)

मैदानावर जम बसल्यानंतर दोघांनी मिळून गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मॅक्सवेल आणि फाफने तिसऱ्या विकेट्साठी ६१ चेंडू १२० धावांची भागीदारी केली. अखेर फॉर्ममध्ये असलेल्या जेसन बेहरनडॉफच्या हाती रोहितने चेंडू सोपावला. बेहरनडॉफने मॅक्सवेलला बाद करत ही जोडी फोडली.

मॅक्सवेल ३९ चेंडूत ६४ धावा काढून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर हा फलंदाजीसाठी आला. मात्र, युवा गोलंदाज कार्तिकेयने त्याला झटपट माघारी पाठवलं. त्यानंतर कॅमरून ग्रीनने फाफ डू प्लेसिसला बाद करत सर्वात मोठा अडथळा दूर केला.

फाफ डू प्लेसिसने ४१ चेंडूत ६५ धावा कुटल्या. यामध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. झटपट ३ विकेट्स पडल्यानंतर आरसीबीची अवस्था ५ बाद १४६ अशी झाली होती. मात्र, त्यानंतर दिनेश कार्तिक आणि केदार जाधवने मुंबईचा डाव सावरला. कार्तिक आज चांगल्या फॉममध्ये दिसत होता. मात्र, १९ व्या षटकात जॉर्डनला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला.

कार्तिकने १८ चेंडूत ३० धावांची खेळी केली. शेवटच्या काही षटकात केदार जाधव आणि हसरंगाने फटकेबाजी करत मुंबईला १९९ धावांपर्यंत पोहचवलं. मुंबईकडून जेसन बेहरनडॉर्फ हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात ३६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय कॅमरून ग्रीन, ख्रिस जॉर्डन आणि कुमार कार्तिकेयने प्रत्येकी १-१ गड्यांना बाद केलं.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com