Nitish Rana Fined : कोलकाता जिंकला, पण राणा चुकला; नितीशला ही मोठी चूक पडली महागात

IPL 2023, KKR Vs PBKS : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात विजय मिळाल्यानं केकेआरचा 'दिल गार्डन गार्डन' झाला खरा, पण कर्णधार नितीश राणाकडून मोठी चूक झाली.
IPL 2023, KKR Vs PBKS, Nitish Rana
IPL 2023, KKR Vs PBKS, Nitish Rana SAAM TV

KKR Vs PBKS IPL 2023 : इडन गार्डन्सवर काल, सोमवारी कोलकाता विरुद्ध पंजाब हा चुरशीचा सामना झाला. त्यात कोलकातानं रोमहर्षक विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात विजय मिळाल्यानं केकेआरचा दिल गार्डन गार्डन झाला खरा, पण कोलकाताचा कर्णधार नितीश राणाकडून मोठी चूक झाली आणि त्याला मोठा भुर्दंड बसला. (Latest sports updates)

शिखर धवनच्या पंजाब किंग्जविरुद्ध ५ गडी राखून विजय मिळवणाऱ्या केकेआरने आयपीएलमधील आपलं आव्हान टिकवून ठेवलं आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यातील विजयाची 'कथा' रचली जात असतानाच, नितीश राणाकडून गलती से मिस्टेक झाली. स्लो ओव्हर रेटचा त्याला विसर पडला आणि त्याला कर्णधार म्हणून दंड ठोठावण्यात आला. आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला हा दंड आकारण्यात आला आहे.

IPL 2023, KKR Vs PBKS, Nitish Rana
KKR vs GT IPL Match: मिलर-शंकरकडून गोलंदाजांची धुलाई; गुजरातचा ७ गडी राखून कोलकातावर मोठा विजय

सामन्यातून किती रक्कम दंड म्हणून भरावी लागणार?

स्लो ओव्हर रेटशी संबंधित कोलकाता संघाचा कर्णधार नितीश राणाची पहिलीच चूक होती. त्यामुळे त्याच्या सामन्याच्या मानधनातून १२ लाख रुपयांची कपात केली जाणार आहे. याचाच अर्थ त्याला १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश राणाने स्लो ओव्हर रेट संबंधित चूक मॅच रेफरीसमोर स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची आवश्यकता नाही.

IPL 2023, KKR Vs PBKS, Nitish Rana
MI Vs RCB : बेंगळुरूविरुद्धच्या सामन्याआधीच मुंबई इंडियन्सला जोरदार झटका, अचानक झाला मोठा बदल

राणाजी गलती तुम्हारें से हो गई...

आयपीएल २०२३ मध्ये नितीश राणाला दुसऱ्यांदा दंड भरावा लागला आहे. याआधी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम त्याला दंड म्हणून आकारण्यात आली. सामना सुरू असतानाच, गोलंदाज ऋतिक शौकिन याच्यासोबत वाद घातल्यामुळे त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती.

ही चूक करणारा राणा पहिला कर्णधार नाही...

आयपीएलच्या या मोसमात स्लो ओव्हर रेटमुळे दंड भरावा लागलेला नितीश राणा हा पहिलाच कर्णधार नाही. पंजाब किंग्ज विरुद्ध धमाकेदार अर्धशतक झळकावून विजयात मोलाचा वाटा उचलणारा नितीश राणा याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या, फाफ डु प्लेसी, केएल राहुल यांनाही दंड भरावा लागला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com