MI Vs RCB : बेंगळुरूविरुद्धच्या सामन्याआधीच मुंबई इंडियन्सला जोरदार झटका, अचानक झाला मोठा बदल

Jofra Archer Ruled out : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. ज्याची भीती होती अखेर तेच झालं.
MI Vs RCB, Rohit Sharma vs Virat Kohli
MI Vs RCB, Rohit Sharma vs Virat KohliSAAM TV
Published On

Jofra Archer Ruled out : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. ज्याची भीती होती अखेर तेच झालं. तेजतर्रार गोलंदाज जोफ्रा आर्चर IPL 2023 मधून बाहेर झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात आता त्याच्या जागी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज क्रिस जॉर्डन याला स्थान देण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्समध्ये पहिल्या सामन्यापासून गोलंदाजांची उणीव भासत आहे. अशातच ज्याच्यावर भिस्त होती असा जोफ्रा आर्चरच उर्वरित आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. जॉर्डनची मुंबईच्या ताफ्यात एन्ट्री झाल्यानंतर ऑउट ऑफ फॉर्म असलेला जोफ्रा बाहेर होईल, अशी शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती. आता तीच शक्यता खरी ठरली आहे. (Latest sports updates)

MI Vs RCB, Rohit Sharma vs Virat Kohli
KL Rahul Replacement: केएल राहुलच्या दुखापतीने चमकलं 'मुंबईकराचं' नशीब! WTC फायनलसाठी थेट भारतीय संघात संधी

आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. त्यातील ५ सामन्यात जोफ्रा आर्चर खेळला आहे. सुरुवातीच्या लढतींना जोफ्रा मुकला होता. तो उपचारांसाठी बेल्जियमला गेल्याचे वृत्त येऊन धडकले होते. मात्र, आर्चरने त्यानंतर या वृत्ताचं खंडन केले होते. काही दिवस उलटत नाही तोच आर्चर आयपीएलमधून बाहेर झाल्याचे वृत्त येऊन धडकले आहे.

आर्चरची कामगिरी जेमतेम

आयपीएल २०२३ मध्ये जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्ससाठी ६ मे रोजी अखेरचा सामना खेळला. तो चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धचा सामना होता. त्यात आर्चरला गोलंदाजीची कमाल दाखवता आली नाही. या मोसमात खेळलेल्या ५ सामन्यांत त्याला अपेक्षित यश आले नाही.

जोफ्रा आर्चर गोलंदाजीत फारशी कमाल दाखवू शकला नाही. मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या ५ सामन्यांत अवघ्या दोन विकेट घेतल्या आहेत.

MI Vs RCB, Rohit Sharma vs Virat Kohli
KKR vs PBKS IPL Match Result: रोमहर्षक सामन्यात कोलकाताची पंजाबवर मात; शेवटच्या षटकात सामना फिरला

आर्चरच्या दुखापतीवर इंग्लंड क्रिकेट बोर्ड लक्ष ठेवून आहे. जोफ्राने माघार घ्यायचे एकमेव कारण म्हणजे अॅशेजसारखी महत्वाची कसोटी मालिका असल्याचे सांगितले जाते. आर्चर या मालिकेआधी फिट होऊन संघात यावा, अशी अपेक्षा बोर्डाला आहे. त्यामुळे आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर थेट इंग्लंडमध्ये जाऊन रिहॅबचा विचार करत आहे.

आर्चरच्या जागी जॉर्डन

मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला आयपीएल २०२३ साठी रिटेन केला होता. त्याला २०२२ च्या लिलावात फ्रँचाइजीने ८ कोटी रुपयांना खरेदी केला होता. मात्र, दुखापतीमुळे तो मागील पर्वात खेळला नव्हता. आता आयपीएल २०२३ मध्ये केवळ ५ सामने खेळून तो स्पर्धेबाहेर झाला आहे.

जोफ्रा आर्चरची जागा इंग्लंडचाच खेळाडू क्रिस जॉर्डन याने घेतली आहे. २०१६ मध्ये जॉर्डनने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. इंग्लंडसाठी तो ८७ टी २० सामने खेळला आहे. आयपीएलमध्येही तो २८ सामने खेळला असून २७ विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com